धाराशिव अंतर्गत अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका भरती
धाराशिव - एकात्मिक बालविकास सेवा योजना ग्रामीण प्रकल्प धाराशिव अंतर्गत 11 गावातील नमूद केलेल्या अंगणवाडी मधील रिक्त असलेले मिनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त झालेली पदे महाराष्ट्र शासन, महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णयामधील निकष, अटी, शर्ती, गुणदान पध्दतीच्या आधिन राहून मिनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदासाठी फक्त त्या त्या गावातील पात्र महिला उमेदवारांकडून विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
कौडगांव अंगणवाडी (क्र.0117 आणि क्र.118) मध्ये मदतनीस (02), अंबेहोळ अंगणवाडी (क्र.0123), कारी अंगणवाडी (क्र.0130), वडगाव (सि.) अंगणवाडी (क्र.0205) मध्ये प्रत्येकी एक मदतनीस, बेंबळी अंगणवाडी (क्र.0306, 0313, 315 आणि 316) मध्ये मदतनीस (04), रुईभर अंगणवाडी (क्र.0323 आणि 0325) मध्ये मदतनीस (02), अंबेवाडी अंगणवाडी (क्र.0406) मध्ये एक मदतनीस, करजखेडा अंगणवाडी (क्र.0508 आणि 0509) मध्ये मदतनीस (02), ताकवीकी अंगणवाडी (क्र.0514), सारोळा अंगणवाडी (क्र.0718) आणि सांजा अंगणवाडी (क्र.0732) मध्ये प्रत्येकी एक मदतनीस पदांची भरती करण्यात येणार आहे.
या पदासाठी प्रकल्प कार्यालयाने विहीत नमुन्यातील प्रमाणित केलेले अर्ज आवश्यक त्या कागदपत्र व प्रमाणपत्रासह परिपूर्ण भरलेला अर्ज दि. 26 जून ते 10 जुलै 2023 पर्यंत अर्ज प्रकल्प कार्यालयात कार्यालयीन वेळेत एकात्मिक बालविकास सेवा योजना, ग्रामीण प्रकल्प, उस्मानाबाद येथील कार्यालयात (सुट्टीचे दिवस वगळून) स्विकारले जाणार आहेत.