कोरोनापासून संरक्षणासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय : राहुल गुप्ता

 
corona

उस्मानाबाद - कोरोना या महामारीपासून संरक्षणासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय व पर्याय असल्याने यापुढे लॉकडाऊन टाळावयाचे असल्यास पहिला आणि दुसरा डोस देय असणाऱ्या सर्व पात्र नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. असे आवाहन जि.प चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी नुक्तेच केले.

 हर घर दस्तक मोहीम-2 च्या अनुषंगाने आयोजित जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवकुमार हालकूडे , - जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ.के.के मिटकरी , प्रतिनिधी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन बोडके जिल्हा समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौगुले, शिक्षणाधिकारी माध्यमिक गजानन सुसर , शिक्षणाधिकारी (प्राथमिक)चे प्रतिनिधी अ.भा.मोहरे, कुष्ठरोगचे सहा.संचालक डॉ. रफीक अन्सारी, सहाय्यक संचालक ( कुष्ठरोग ) डॉ.अतुल घोगरे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.एम.आर.पांचाळ, वैद्यकीय अधिकारी जिल्हा क्षयरोग कार्यालय डॉ. विवेक होळे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. गजानन परळीकर, सांख्यिकी पर्यवेक्षक एच. के. पवार, जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी किशोर तांदळे, सांख्यिकी अन्वेषक कलीम शेख तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे उपस्थित होते

जिल्हयात दि. १५ जून २०२२ पासून शाळा नियमीतपणे सुरु होणार असल्याने शाळेतील व महाविद्यालयीन १२ ते १८ वयोगटातील लाभार्थ्यांचे शाळा निहाय नियोजन तयार करून लसीकरण पूर्ण करून घेण्यात यावे..तसेच महिलांना व गरोदर मातांना लसीकरणाचे फायदे सांगून व लसीकरणाबाबत त्यांच्या मनात असणारे गैरसमज दूर करण्यासाठी महिला स्त्रीरोगतज्ज्ञ यांच्यामार्फत समुपदेशन करून लसीकरण पूर्ण करून घेण्यात यावे,अशा सूचनाही श्री. गुप्ता यांनी यावेळी केल्या.

डॉ. शिवकुमार हालकुडे यांनी, दि.१६ जानेवारी २०२१ पासून जिल्ह्यात  कोविड-१९ लसीकरण मोहिम राबविली जात आहे. उस्मानाबाद जिल्हयातील कोविड- १९ प्रतिबंधात्मक लसीची पहिली मात्रा मिळालेल्या नागरिकांची टक्केवारी ८३.३७टक्के इतकी तर दुसरी मात्रा घेतलेल्या नागरिकांची टक्केवारी ६२.२० टक्के आहे. अद्यापही जिल्हयातील १६.६३टक्के नागरिकांनी पहिली आणि ३७.८० टक्के नागरिकांनी दुसरी मात्रा घेतलेली नाही. यासाठी जिल्हयातील सर्व शंभर टक्के लाभार्थीना कोविड- १९ प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा देवून संरक्षित करणे तसेच ६० वर्षावरील लाभार्थींना प्रिकॉशन डोस देणे (लसीकरणाचा मैलाचा दगड) आवश्यक असल्याने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनान्वये आपल्या जिल्हयात जून आणि जुलै २०२२ या कालावधीत “हर घर दस्तक” मोहिम – दोन’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. मोहिमेअंतर्गत लोकांमध्ये जनजागृती करुन प्रत्येक घरांपर्यंत पोहोचून लसीकरणापासून वंचित असलेल्या (पहिला डोस, दुसरा डोस व प्रिकॉशन डोस ) पात्र लाभार्थींचा शोध घेणे, त्यांचे COWIN अॅपच्या माध्यमातून नोंदणी करुन त्याच ठिकाणी देय डोस देण्यात येणार आहे. जिल्हा कृतीदल समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी आभार मानले.

From around the web