उस्मानाबादेत रोजगार मेळावा ... नामांकित कंपन्यांमध्ये 227 पदासाठी होणार निवड

 
job

उस्मानाबाद -  उस्मानाबाद जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांतर्गत मॉडेल करिअर सेंटर आणि मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र (BTRI) द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शिकाऊ उमेदवारांसाठी खाजगी क्षेत्रातील नामांकित उद्योजक, कंपनी यांच्याकडील 227 पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक पुरुष उमेदवारांच्या मुलाखती घेऊन निवड प्रक्रिया करणार आहेत.

               पुणे येथील एसएमपी फॅसिलिटी सर्व्हिसेस प्रा.लि.भोसरी, टेस्टी बाईटस् ईटॅबल्स लि.भंडागाव पुणे/औरंगाबाद येथील एन्ड्युरंस टेक्नोलॉजी प्रा.लि., तुळजापूर-तामलवाडी येथील किसान इरीगेशन ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर लि. आणि उस्मानाबाद येथील सन इंटिरिओ या विविध कंपनीत उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. वेतन व सुविधांबाबत संबंधित कंपनीच्या नियमानुसार प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी कंपनीचे अधिकारी, प्रतिनिधी सविस्तर माहिती व मार्गदर्शन करतील. उमेदवारांनी येताना शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक, प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला (टीसी), अनुभव असल्यास प्रमाणपत्र, एम्पलॉयमेंट रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, शैक्षणिक बायोडाटा आणि पासपोर्ट साईज फोटो आदी कागदपत्रे सोबत आणावीत. उस्मानाबाद येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सोलापूर रोड येथे सोमवार,दि.12 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी  02472-299434, 9028238465 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

                 इच्छुक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in / www.ncs.gov.in या संकेतस्थळावर नोकरी साधक (Job Seeker) नोंदणी निशुल्क करावी. त्यानंतर मेळाव्यातील पदांचा पसंतीक्रम नोंदविण्यांकरिता संकेतस्थळाला भेट देऊन होम पेजवरील नोकरी साधक (Job Seeker) लॉगीनमधून आपल्या युजर आयडी आणि पासवर्डने लॉगीन करुन Pandit Dindayal Upadhyay Job Fair ऑप्शनमधील रिक्तपदांची माहिती घेऊन आपल्या पात्रतेनुसार पात्र असलेल्या पदासाठी अप्लाय करावे. जिल्ह्यातील जास्तीत इच्छुक उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त संजय गुरव यांनी केले आहे. 

From around the web