उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष / उपाध्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी एक तर  शिवसेना एकाकी 
 
news

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष / उपाध्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट पडली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एक झाली असून, शिवसेना एकाकी  पडली आहे. आज तीन वाजता अध्यक्ष / उपाध्यक्ष पदाची निवडणूक होत आहे. 

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली होती. तर भाजपने एकाकी लढत दिली होती. महाविकास आघाडीने पाच जागा बिनविरोध तर दहा जागा जागा मोठ्या मताधिक्याने जिंकल्या होत्या. त्यात शिवसेना ५, काँग्रेस ५ आणि राष्ट्रवादी ५ चे उमेदवार विजयी  झाले होते. २१ फेबुवारी रोजी निवडणूक पार पडली होती. 

आज तीन वाजता अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एक झाली असून, शिवसेना एकाकी  पडली आहे. अध्यक्षपदासाठी काँग्रेसतर्फे बापूराव पाटील तर शिवसेनेतर्फे संजय देशमुख यांनी अर्ज दाखल केला आहे तर उपाध्यक्षपदासाठी राष्टवादीतर्फे मधुकर मोटे तर शिवसेनेतर्फे बळवंत तांबारे यांनी अर्ज दाखल केला. आहे. या निवडणुकीत बापूराव पाटील आणि मधुकर मोटे यांचा विजय निश्चित आहे.

महाविकास आघाडी करणाऱ्या खासदार ओमराजे निंबाळकर यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मोठा धोका दिला आहे. 


 

From around the web