तोतयागिरी करुन फसवणाऱ्यांपासून नागरिकांनी  जागरुक रहावे - पोलीस अधीक्षक 

 
osmanabadsp

उस्मानाबाद - तोतयागिरी करुन फसवणाऱ्यांपासून नागरिकांनी  जागरुक रहावे , असे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील जनतेस केले आहे.

तोतयागिरी करुन दागिने, रक्कम इत्यादी उकळण्याचा प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यात घडत आहे. या प्रकारात अज्ञात स्त्री- पुरुष हे आपण पोलीस, नगरपालीका अधिकारी इत्यादी खात्यांतील असल्याची बतावणी करुन बनावट ओळखपत्रे दाखवून नागरीक विशेषत: वयोवृध्द व्यक्ती यांना त्यांच्याजवळील सुवर्ण दागिने, पैसे असा ऐवज काढून ठेवण्यास सांगूण तो ऐवज ते तोतया स्त्री- पुरुष हातचलाखीने आपल्याकडे घेउन त्यांची फसवणूक करतात. 

अशा प्रकारातून जनतेची मोठ्या प्रमाणात फसवणूक होण्याची शक्यता असल्याने उस्मानाबाद शहरातील जनतेने विशेषत: सार्वजनिक ठिकाणे यात बाजारपेठा, धार्मीक स्थळे इत्यादी ठिकाणी कोणी पोलीस अथवा अन्य खात्यातील अधिकारी- कर्मचारी असल्याची बतावणी करुन आपल्याजवळील मौल्यवान वस्तू काढण्यास सांगितले असता आपणास ते खोटे बोलून तोतयागिरी करत असल्याची खात्रीझाल्यास होणारी संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी नजीकच्या पोलीस ठाण्यास अथवा पोलीस मदत क्रमांक ‘डायल 112’ शी संपर्क साधावा. असे आवाहन  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील जनतेस केले आहे.

From around the web