तुळजापूर तालुक्यातील घटनेच्या निषेधार्थ  जिल्हाधिकारी कार्यालयावर नागरिकांचा संतप्त मोर्चा 

 
s

उस्मानाबाद - तुळजापूर तालुक्यातील एका खेडेगावात एका सहा वर्षाच्या चिमुरडीवर ३५ वर्षीय नराधमाने पाशवी अत्याचार करून गुप्तांगावर वार केले होते, सदर पीडित मुलीला उस्मानाबादच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

या घटनेमुळे जिल्ह्यात संतापाची  लाट उसळली असून, सर्व धर्माच्या आणि जातीच्या लोकांनी एकत्र येत  जिल्हाधिकारी कार्यालयावर  मोर्चा काढून आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. 

ss

त्या नराधमाचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय 

तुळजापूर तालुक्यातील एका खेडेगावात सहा वर्षाच्या एका चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या त्या नराधमाचे  वकीलपत्र न घेण्याचा निर्णय उस्मानाबादच्या वकिलांनी घेतला आहे. या घटनेचा निषेध ऍड. नितीन भोसले यांनी करून, आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. 

तुळजापूर तालुक्यातील एका खेडेगावात सहा वर्षाच्या चिमुरडीवर पाशवी अत्याचार करून तिच्या गुप्तांगावर वर करण्यात आले . आरोपीचे वय साधारण ३५ असून, त्याच्याविरुद्ध तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केले जात आहेत. 


विशेष सरकारी वकील नियुक्त करून खटल्याची सुनावणी करा - आ. राणाजगजितसिंह पाटील
 
तुळजापूर तालुक्यातील बालिकेवरील अतिप्रसंगाची अमानुष घटना अतिशय संतापजनक व निंदनीय आहे. विशेष सरकारी वकील नियुक्त करून खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात घेण्यात येईल. गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नराधमाला फाशी ची शिक्षा मागणार, असल्याचे आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितले. 

सदर घटना मानवतेला काळीमा फासणारी ही घटना असून पोलीस अधीक्षक यांना जलद गतीने दोषारोपपत्र दाखल करण्याचे सूचित केले असुन तपासात आवश्यक पुरावे गोळा करण्यात आले आहेत. पीडितेची तब्येत स्थिर असून योग्य ते उपचार सुरू आहेत. वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून वेळोवेळी तब्येतीची माहिती घेण्यात येत आहे. पीडितेच्या कुटुंबियांशी संपर्क करून त्यांना धीर दिला असून सर्वतोपरी मदत केली जाईल. 

घटनेचं गांभीर्य लक्षात घेतां पोलीस अधीक्षक यांना विशेष सरकारी वकील नियुक्तीचा प्रस्ताव राज्य सरकार कडे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेष सरकारी वकील नियुक्त करून खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात घेण्याची कारवाई देखील करण्यात येणार आहे. गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नराधमाला विशेष सरकारी वकीलांकडुन फाशी ची शिक्षा मागण्यात येईल, असेही आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितले, 

फास्ट ट्रॅक कोर्टात चालवुन आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी - एम.आय.एम . 

xs

तुळजापूर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची तात्काळ चौकशी करुन सदरील प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवुन आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी, अशा मागणीचे निवेदन एम आय एम शहर अध्यक्ष अजहर सय्यद यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, तुळजापूर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर याच गावातील एका व्यक्तींने अत्यंत घृणास्पद व पाशवी कुकर्म व अत्याचार केला आहे. सदरील गुन्ह्याची तात्काळ चौकशी करुन सदर प्रकरण फास्ट टृॅक कोर्टात चालवुन आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी. जेणे करुन समाजात वावरत असलेल्या अशा विकृत माणसिकतेच्या लोकांवर कायदा व सुव्यवस्थेचा धाक बसेल भविष्यात अशा प्रकारचे लांच्छनास्पद व घृणास्पद कृत्य करणार नाहीत. 
 या निवेदनावर  शहर अध्यक्ष अजहर सय्यद, माजी शहर अध्यक्ष मोहसिन शेख, समाजसेवक अजहर मुजवार, शहर उपाध्यक्ष अजर निचलकर, नुमान रजवी, अल्फाज शेख, जमीर खान यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

 बलात्कार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्या- अल्पसंख्यक विकास मंडळ 

तुळजापूर तालुक्यातील एका खेडेगावात ६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा देण्याची मागणी  अल्पसंख्याक विकास मंडळ उस्मानाबादच्या वतीने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगाकर यांच्या मार्फत गृह मंत्री  महाराष्ट्र राज्य मंत्रालय , मुंबई यांच्याकडे दि . 1  रोजी निवेदनाव्दारे करण्यात आली  आहे. 

 तुळजापूर तालुक्यातील  एका खेडेगावातील ६ वर्षीय चिमकलीवर बलात्कार करून त्या मुलीच्या गुप्त अंगावर शस्त्राने वार केले आहेत , असे वाईट कृत्य करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी जेणे करून असे कृत्य करण्याची कोणत्याही इतर नराधामाची हिंमत होणार नाही . सदर घृणास्पद घटनेचा तालुक्यासह जिल्हयात तिव्र संताप व्यक्त केला जात आहे . परंतु सध्या सणा- सुदीचे दिवस कारणाने असल्या आम्ही आंदोलने , बंद न ठेवता आपल्याकडे लोकशाही मार्गाने न्याय मिळण्याची मागणी करीत आहोत . तरी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा देण्याची मागणी  अल्पसंख्याक विकास मंडळ उस्मनाबादच्या वतीने निवेदनाव्दारे करण्यात आली . निवेदनावर  अल्पसंख्याक विकास मंडळ उस्मनाबाद जिल्हा अध्यक्ष शेख जफर रब्बानी  यांची स्वाक्षरी आहे .
 

From around the web