कोरोनामुळे प्रभावित कुटुंबियांच्या मदतीसाठी सर्व समावेशक योजना आखावी

  -डॉ.नीलम गोऱ्हे
 
s

उस्मानाबाद : कोरोनामध्ये विधवा झालेल्या महिलांना संपत्तीतला अधिकार मिळवून देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची मदत घ्यावी आणि शेतकरी तसेच सामान्य कुटुंबातील विधवा महिलांना त्या त्या बालकांना शिक्षणासाठी विशेष प्रयत्न करावेत, विधवा महिलांना बी-बीयाणे, खते इत्यादी बाबत पुढील चार ते पाच वर्ष काम करण्याचे नियोजन करावे,तसेच ज्या विधवांचे लग्न झाले आहेत.त्यांच्या बालकांसाठीही सामाजिक दायित्व आणि सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांची सोय बालगृहासह सामाजिक न्याय विभागाच्या त्यांची विचारपूस करावी. सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घ्या.राज्य शासनाने प्रत्येक जिल्हयाला तीनशे कोटीचा निधी अशा प्रकारच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी मंजूर केला आहे. शाश्वत विकास उदिष्टपूर्ती करण्याच्या अनुषंगाने या निधीचा वापर करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमाबाबत मागणी करावी, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांनी यावेळी केल्या.

यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे-पाटील, पोलिस अधीक्षक श्रीमती नीवा जैन, अपर जिल्हाधिकारी श्रीमती रुपाली आवले-डंबे, अति. मुख्य कार्यकारी विलास जाधव, अपर पोलिस अधीक्षक नवनीत कांवत, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) महेंद्रकुमार कांबळे, प्रकल्प संचालक (जि.ग्रा.वि.यं.) श्रीमती प्रांजल शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती स्वाती शेंडे, जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन लक्ष्मण झाडे, दुकाने निरीक्षक सरकारी कामगार अधिकारी काशिद ए.एस., सहा.आयुक्त समाजकल्याण अरवत बी.जी., जिल्हा संरक्षण अधिकारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी.डी.भोसले, सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी रा.अ. जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धनंजय पाटील, जि.प.चे अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एस.एन.हलकुडे, कोविड नोडल ऑफिसर डॉ.आय.के.मुल्ला, डॉ.के.के.मिटकरी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (एन.एच.एम.) डॉ.गरड के.ए., न.प.चे जिल्हा प्रशासन अधिकारी रामकृष्ण जाधव, संजय कदम, समाज कल्याणचे कार्यालय अधीक्षक चव्हाण एम.जे., जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे तंत्र अधिकारी लिमकर एस.एन., जि.प.चे उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) डॉ.ए.बी.मोहरे,व्ही.वाय.सरतापे, तहसीलदार (संगायो) मनिषा मेने, तहसीलदार (महसूल) प्रविण पांडे, जिल्हा व्यवस्थापक (एमएसआरएलएम) समाधान जोगदंड आदींची उपस्थिती होती.  

कोरोनाच्या कालावधीत अनेक परीवारांनी आपल्या घरातील कर्ता गमावला आहे.त्या कुटुंबीयांचे पुर्नवसन योग्य रितीने होणे आवश्यक आहे. तसेच या भयंकर महामारीमुळे  ज्या अनेक बालकांनी आपले आई - वडील दोन्ही गमावले आहेत, त्यांची देखरेख आणि शिक्षण व्यवस्थीत होत आहे किंवा कसे याची दक्षता घेणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.त्यामुळे आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, महसूल,नगर पालिका,कृषी, शिक्षण आणि गृह विभागाने तसेच समाज कल्याण विभागानेही या विधवा महिला व अनाथ बालकांसाठी एक सर्वसमावेशक योजना आखावी, तसेच पतीचे निधन झाल्यानंतर त्याची संपत्ती किंवा मालमत्ता विधवा पत्नीच्या नावावर करण्यासाठी प्रशासनाने तालुकानिहाय शिबीरे घेऊन काम करावे, असे निर्देश डॉ.गोऱ्हे यांनी दिले.

कोविडमुळे उस्मानाबाद जिल्हयात 2 हजार 106 मृत्यू झाले आहेत. यापैकी एक हजार 903 कुटुंबीयांना मदत मंजूर झाली आहे. तथापि, अद्यापही मदत मिळाली नाही. तेव्हा सर्वांना मदत मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी आयोजित होणाऱ्या लोकशाही दिनाबाबतही नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करावी, जिल्हयात दोन्ही लसीकरणाचे प्रमाण वाढवावे.कर्तव्य बजावताना कोरोनामुळे दगावलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदत मिळवून देण्यासाठी कार्यवाही करावी,येणारी पाच वर्षे कोरोनामुळे प्रभावीत झालेल्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी समर्पित करून काम करावे, असे आवाहनही डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी केले.

महिला आणि समाजासाठी अधिक काम करण्यासाठी जिल्हा पातळीवरील अधिकारी वर्गाचे विशेष प्रशिक्षण घेण्यात यावे आणि आलेल्या निधीचा योग्य वापर करावा. 1 मे कामगार दिनाचे औचित्य साधून कामगार कल्याण विभागाने असंघटीत कामगारांसाठी 27 एप्रिल ते 10 मे पर्यंत विशेष मोहिम राबवावी, अशा सूचनाही डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी दिल्या.

From around the web