उस्मानाबाद जिल्ह्यात १ जून रोजी ८९ कोरोना पॉजिटीव्ह, ८ मृत्यू 

कोरोना रुग्ण बरे होण्याचे ९३.१६  टक्के तर ‌मृत्यूचे २.२६ प्रमाण टक्के
 
corona
उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयाने कोरोना मृत्यूची आकडेवारी लपवली ?

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज १ जून ( मंगळवार ) रोजी ८९ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ५६५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात ८ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या घटली असून, त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी थोडासा सुस्कारा सोडला आहे. मात्र मृत्यूचं प्रमाण रोखणं आरोग्य विभागाच्या समोर एक आव्हान आहे. 


उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ५५ हजार ३६ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ५१  हजार २७२ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १२४९ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या २५१५ झाली आहे

आज फक्त काही तालुक्याचे रॅपिड अँटीजेन टेस्ट चे अहवाल प्राप्त झाले  असल्यामुळे फक्त 89 रुग्ण पॉझिटिव्ह दिसत आहेत.... प्रत्यक्ष पॉझिटिव्ह रुग्णसंख्या जास्त असून उद्याच्या प्रेस नोट मध्ये आजच्या पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची नोंद घेण्यात येईल, असे जिल्हा रुग्णालयाकडून सांगण्यात आले. 

उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयाने कोरोना मृत्यूची आकडेवारी लपवली ?

उस्मानाबाद - गेल्या आठ दिवसापासून कोरोनामुळे दररोज आठ मृत्यू होत असल्याची आकडेवारी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रेस नोट मध्ये प्रसिद्ध केली जात आहे.  त्यात २४ ते ४८ तासातील  मृत्यू  २ ते ३ आहे तर ७२  तासाच्या नंतरचे मृत्यू किमान ५ आहेत. 

मागील महिन्यात उस्मानाबाद जिल्ह्यात मृत्यूचे जे तांडव सुरु होते, त्यावेळी आकडेवारी लपवण्यात आली  आणि आता मृत्यू संख्या कमी झाल्यानंतर मागील  आकडेवारी त्यात मिसळून प्रसिद्ध केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. 

मागील महिन्यात कोरोनामुळे  किमान २० मृत्यू होत होते. मृत्यूचा आकडा त्यापेक्षा मोठा होता, पण आपला नाकर्तेपणा लपवण्यासाठी आकडेवारी लपवण्यात आली आणि आता मृत्यूची आकडेवारी कमी झाल्यानंतर मागील मृत्यूची नोंद चालू मृत्यूच्या नोंदीमध्ये घेतली जात आहे. 

दररोज आठच मृत्यू कसे ? 

मागील आठ दिवसापासून कोरोना रुग्णाची संख्या कमी झाली आहे. पाचशेच्या आत कोरोना रुग्णाची संख्या आहे, मात्र मृत्यूची संख्या आठच आहे. 


 

From around the web