साहेबांच्या पानाला उशीर झाला म्हणून पोलिसांनी तरुणास बदडले 

पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल मुक्रम पठाण निलंबित 
 
s
उस्मानाबाद लाइव्हचा दणका 

उस्मानाबाद  -  साहेबांच्या पानाला उशीर झाला म्हणून  शहरातील एका तरुणास आनंदनगर पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये नेवून बदडले होते. उस्मानाबाद लाइव्हच्या दणक्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली होती. याप्रकरणी तीन पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. 

रिक्षाचालक फरीद शेख मारहाण प्रकरणी आनंदनगर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण, पोलीस वाहन चालक पोकॉ मुक्रम पठाण यांच्यासह तीन पोलीस कर्मचाऱ्यावर आनंदनगर पोलीस स्टेशनच गुन्हा दाखल  झाल्यानंतर आता दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे.  उस्मानाबाद लाइव्हने या संपूर्ण प्रकारणाचा प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. 

काय आहे प्रकरण ? 

शहरातील ज्ञानेश्वर मंदिराजवळ असलेल्या एका पान टपरीवर २१ ऑगस्ट ( शनिवारी ) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास फरीद शेख ( वय २६, रा. समर्थनगर )  हा तरुण उभारला होता. यावेळी आनंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चव्हाण आणि त्यांचा चालक पठाण आले आणि त्यांनी  टपरी चालकास पान-सुपारीची मागणी केली 

यावेळी अन्य दोन ग्राहक उभारले होते. पान टपरी चालकास पान देण्यास उशीर झाल्याने पोलीस निरीक्षक चव्हाण यांचा चालक मुक्रम पठाण याने ' तुला साहेब दिसत नाहीत का ? तुला पोलिसांचा इंगा दाखविला पाहिजे असे म्हणून अश्लील शिवीगाळ सुरु केली. 

यावेळी टपरी चालकाचा मित्र फरीद शेख याने पठाण यास शिवीगाळ करू नका म्हणून मध्यस्थी केली असता, तू मध्ये पडू नको म्हणून पठाण याने त्यासही शिवीगाळ सुरु केली. त्यानंतर त्याने पोलीस गाडीत बस म्हणून जबरदस्तीने गाडीत बसविले आणि आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये नेले. 

आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक चव्हाण,  मुक्रम पठाण आणि अन्य दोन पोलिसांनी फरीद शेख  यास लाथाबुक्यांनी आणि बेल्स्टने डोक्यावर आणि हातापायावर रक्तबंबाळ होईपर्यंत बेदम मारहाण केली होती. 

याप्रकरणी उस्मानाबाद लाइव्हने आवाज उठवल्यानंतर फरीद शेख मारहाण प्रकरणी पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण, पोलीस वाहन चालक पोकॉ मुक्रम पठाण यांच्यासह तीन पोलीस कर्मचाऱ्यावर आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये २४ ऑगस्ट रोजी  भादंवि ३४१, ३२४,३२३,५०४,३४ प्रमाणे गुन्हा दखल करण्यात आला होता. 

त्यानंतर आता पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण, पोलीस वाहन चालक पोकॉ मुक्रम पठाण  यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे. आता या दोघांना अटक करून कोर्टात कधी उभे करणार ? याकडे लक्ष वेधले आहे. 

संबंधित बातम्या 

उस्मानाबादच्या आनंदनगर पोलिसांचा तालिबानी कारभार ( Video )

वादग्रस्त पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण यांची सोलापूरच्या ट्रेनिंग सेंटरला उचलबांगडी

पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण यांच्यासह तीन पोलीस कर्मचाऱ्यावर अखेर गुन्हा दाखल

चव्हाणांची मुजोरी ! पोलिसांची बदनामी !!

From around the web