उस्मानाबाद लाइव्हच्या दणक्यानंतर उस्मानाबादेत मटका / जुगार विरोधी कारवाई

 
d

उस्मानाबाद - उस्मानाबाद लाइव्हच्या दणक्यानंतर उस्मानाबाद पोलिसांनी तीन मटका एजंटावर कारवाई केली आहे. शहरात जवळपास ५० ते ६० एजंट असून, एक मुख्य मटका बुकी चालक आहे. या सर्वावर पोलीस कधी फास आवळणार ? की जुजबी कारवाई करून सोडून देणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

उस्मानाबाद शहरातील सर्व अवैध धंदे बंद करावेत अशी मागणी शिवसनेच्या कार्यकर्त्यांनी केली होती, पण पोलिसांनी शिवसेनेच्या निवेदनाला केराची टोपली दाखवली होती. याप्रकरणी उस्मानाबाद लाइव्हने वृत्त दिले होते. त्यानंतर पोलिसांनी कारवाई  सुरु केली आहे. 

अवैध धंदे बंद करण्याची शिवसेनेची मागणी

शिवसेनेच्या निवेदनाला पोलिसांची केराची टोपली ...

उस्मानाबादेत तीन मटका एजंटावर  कारवाई 

 सादीक सययद  व राजेंद्र काशीद हे दोघे  ठरावीक दलाली रककम घेउन मटका बुकी-सोमनाथ चपने यांच्या करीता नगर पालीका मुख्यालया समोरील  दोन टप-यांत मटका-जुगार व्यवसाय चालवत असल्याचे  दिनांक 02 जुलै रोजी  15.30 वा  आनंदनगर पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी ते जुगार साहित्य व  अनुक्रमे 650 रु व  710 रु रक्कम जप्त करुन म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 श्रीराम ओव्हळ हे  सांजा चौकात  दिनांक 02 जुलै रोजी 19.30 वा  मटका-जुगार व्यवसाय चालवत  असल्याचे उस्मानाबाद-शहर पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी ते जुगार साहित्य व   1550 रु रक्कम जप्त करुन म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर आणि उमरग्यात कारवाई 

तुळजापूर : राम मांगडे व विक्रम नाईकवाडी हे दोघे दिनांक 02 जुलै रोजी 20.30 वा  घाटशिळ तुळजापूर येथे जुगार साहित्य व  870 रु रक्कमेसह मटका-जुगार व्यवसाय चालवत  असल्याचे तुळजापूर  पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी  साहित्य व रककम जप्त करुन म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा : राजेंद्र जाध्व रा.तुरोरी हे दिनांक 02 जुलै रोजी 18.30 वा  गावातील हॉटेल समोर जुगार साहित्य व  450 रु रक्कमेसह मटका-जुगार व्यवसाय चालवत  असल्याचे उमरगा पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी  साहित्य व रककम जप्त करुन म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web