उस्मानाबाद शहरात मटका आणि जुगार तेजीत
उस्मानाबाद - उस्मानाबाद शहरात मटका आणि ऑनलाईन जुगार तेजीत सुरु असून, अनेक ठिकाणी हातभट्टीची दारू देखील विक्री केली जात आहे. त्यामुळे गोरगरीबांचे संसार उद्धवस्त होत आहेत. शहरातील सर्व अवैध धंदे बंद करावेत अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे शहर प्रमुख संजय उर्फ पप्पू मुंडे यांनी दिला आहे.
उस्मानाबाद शहरात शहर आणि आनंदनगर असे दोन पोलीस स्टेशन आहेत. दोन्ही पोलीस स्टेशनच्या निष्क्रिय पोलीस निरीक्षकांच्या आशीर्वादामुळे शहरात मोठ्या प्रमाणात दोन नंबर धंदे चालू आहेत. यात मटका , जुगार , दोन नंबर ऑनलाईन लॉटरी चालू आहे . यामुळे गोर - गरीब लोकांचे संसार उध्वस्त होत आहेत . तसेच कॉइनचा जुगार ही तेजीत चालू आहे.
हा व्यवसाय करणाऱ्या लोकांवर कुणाचाही अंकुश नाही त्यामुळे असा व्यवसाय करणारे राजरोजपणे खुल्लम खुला व्यवसाय करत आहेत संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले. या निवेदनाची याची दखल न घेतल्यास शिवसेना स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
निवेदनावर शिवसेना शहर प्रमुख संजय उर्फ पप्पू मुंडे,दिलीप जावळे,पंकज पाटील,तुषार निंबाळकर,राजाभाऊ पवार,विजय ढोणे,बंडू आदरकर,बाळासाहेब शिनगारे,सचिन शिंदे,भीमराव भालेकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.