उस्मानाबाद मेडिकल कॉलेज : पीपीपी अट कायम राहिल्यास आ. राणा पाटील बाजी मारणार !

 
उस्मानाबाद मेडिकल कॉलेज : पीपीपी अट कायम राहिल्यास आ. राणा पाटील बाजी मारणार !

उस्मानाबाद - उस्मानाबादला शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर करताना, त्यात एक अट घालण्यात आली आहे. हे कॉलेज खाजगी भागिदारी  (PPP) म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर स्थापन करण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली आहे.


ही  अट  शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास  पाटील यांना मान्य नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबादच्या मेडिकल कॉलेज संदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत पीपीपीला विरोध करून, सिंधुदुर्गच्या धर्तीवर महाविद्यालयासह रुग्णालय देखील शासनाच्या अधिपत्याखाली असावे अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

ग्रामीण भागामध्ये अशी गुंतवणुक करण्यासाठी कुणी तयार होणार नसल्याची अडचण उभयतांनी  बोलुन दाखविली. पण गंमत अशी की , पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपसाठी भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी तयारी दर्शवली आहे. त्यांनी तेरणा ट्रस्टमार्फत शासनाला उस्मानाबादचे मेडिकल कॉलेज चालवण्यास सक्षम असल्याचे पत्र दिले आहे. तेच खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास  पाटील यांना नको आहे. त्यामुळे त्यांनी पीपीपीला कडाडून विरोध केला आहे. 

पीपीपी म्हणजे काय रे भाऊ ? 

उस्मानाबादला मेडिकल कॉलेज उभे करण्यासाठी किमान ७०० कोटी  खर्च येणार आहे. (अनावर्ती खर्च सुमारे रुपये 429.63 कोटी व आवर्ती खर्च सुमारे रूपये 244.51 कोटी) शासन मेडिकल कॉलेज उभे करण्यासाठी इतका खर्च करू शकत नाही. त्यामुळे उस्मानाबादला आजपर्यंत मेडिकल कॉलेज  मंजूर झाले नाही. 

काही महिन्यापूर्वी केंद्र सरकारने एक स्कीम सुरु केली आहे.  प्रत्येक जिल्ह्याला एक मेडिकल कॉलेज उभे करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे. मात्र त्यासाठी पीपीपी ही अट आहे. त्यामुळेच राज्य सरकारने उस्मानाबादचे शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर करताना पीपीपी ही अट ठेवलेली आहे. 

पीपीपी साठी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या अधिपत्याखालील तेरणा ट्रस्टने तयारी दर्शवली आहे. आता राज्य सरकार तेरणाला हे कॉलेज चालवण्यास देणार की अन्य संस्थेस हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

पीपीपी मेडिकल कॉलेज चालवण्यासाठी पायाभूत सुविधा असणे आवश्यक आहे. म्हणजे  किमान  २५ एकर जागा, आर्थिक गुंतवणूक करण्याची क्षमता, कुशल कर्मचारी वर्ग. 

उस्मानाबादचे मेडिकल कॉलेज चालवण्यासाठी  आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या अधिपत्याखालील तेरणा ट्रस्ट , परंड्याचे शिवसेना आमदार आणि माजी मंत्री प्रा. तानाजी सावंत यांची JSPM शिक्षण संस्था ,सुधीर पाटील यांच्या अधिपत्याखालील आदर्श शिक्षण संस्था, डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या अधिपत्याखालील धनेश्वरी संस्था या चार  शिक्षण संस्था पुढे येऊ शकतात. त्यात आ. राणा जगजितसिंह पाटील बाजी मारू शकतात, त्यामुळे उस्मानाबादच्या मेडिकल कॉलेजचे श्रेय नेमके कुणाला ? हा मोठा विनोद ठरणार आहे. 

यापूर्वीचे वृत्त 

उस्मानाबादला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अखेर मंजूर

मेडिकल कॉलेज : पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपला उस्मानाबादच्या शिवसेना खासदार आणि आमदारांचा विरोध

मेडिकल कॉलेज : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी साधला वेबिनावर संवाद

मेडिकल कॉलेज : पीपीपी अट उस्मानाबादकरांच्या मुळावर

From around the web