तुळजापूरचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक राठोड यांची अखेर पोलीस मुख्यालयात उचलबांगडी 

उस्मानाबाद लाइव्हचा दणका 
 
s

तुळजापूर - तुळजापूरचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक एम. ए. राठोड यांची अखेर पोलीस मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आली असून , त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक काशीद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तुळजापूरचे पोलीस निरीक्षक राठोड यांच्या काळात शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले होते तसेच अनेक प्रकरणात त्यांनी हात ओले केले होते तसेच तुळजापूर पोलिसात अंतर्गत वाद वाढला होता. 

तुळजापुरात पुढाऱ्याच्या वाढदिवसाला पोलीस निरीक्षकाची हजेरी, सोशल डिस्टिंसिंगचे तीन - तेरा : पोलीस अधीक्षक काय कारवाई करणार ? तसेच संशयास्पद टाटा सफारी गाडीत नेमकं दडलंय काय ?  तुळजापूर पोलिसांचा आणखी एक कारनामा उघडकीस ! या दोन बातम्या उस्मानाबाद लाइव्ह ने प्रसिद्ध केल्यानंतर त्याची चौकशी झाली असता, त्यात राठोड दोषी निघाले, अखेर राठोड यांची पोलीस मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आली असून, त्यांच्या जागी काशीद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

याच त्या बातम्या 

संशयास्पद टाटा सफारी गाडीत नेमकं दडलंय काय ?

तुळजापुरात पुढाऱ्याच्या वाढदिवसाला पोलीस निरीक्षकाची हजेरी

From around the web