पालकमंत्री शंकरराव गडाख २६ एप्रिल (सोमवारी ) रोजी उस्मानाबाद दौऱ्यावर 

पालकमंत्र्यांनी नियमित दौरा सुरु केल्याने जनतेला दिलासा 
 
पालकमंत्री शंकरराव गडाख २६ एप्रिल (सोमवारी ) रोजी उस्मानाबाद दौऱ्यावर

उस्मानाबाद - पालकमंत्री  शंकरराव गडाख  उद्या सोमवारी ( २६ एप्रिल ) उस्मानाबाद दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते पुन्हा कोरोना संदर्भात आढावा बैठक  घेणार आहेत. त्यामुळे जनतेला दिलासा  मिळाला असून पालकमंत्री उस्मानाबादला येत नाहीत, ही  ओरड आता दूर होणार आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे.  दररोज किमान सातशेपेक्षा जास्त रुग्ण पॉजिटीव्ह येत आहेत तसेच दररोज २० पेक्षा जास्त मृत्यू पावत  आहेत. त्यामुळे जनता भयभीत झाली आहे. 

 भयभीत झालेल्या  जनतेला धीर देण्यासाठी पालकमंत्री शंकरराव  गडाख यांनी नियमित उस्मानाबाद दौरा करणे अपेक्षित असताना ते २६ जानेवारीनंतर उस्मानाबाद जिल्ह्यात फिरकले नव्हते, तेव्हा उस्मानाबाद लाइव्हने त्याचा जोरदार समाचार घेतला होता. 

कोरोनाने थैमान : आरोग्य यंत्रणा 'राम -भरोसे'...

त्यानंतर पालकमंत्री मागील सोमवारी ( १९ एप्रिल ) उस्मानाबाद दौऱ्यावर आले होते. यावेळी उस्मानाबाद लाइव्हने काही प्रश्न उपस्थित करून पालकमंत्र्यांनी दर  आठवड्याला दौरा करण्याची अपेक्षा व्यक्त केली होती,. त्याची  दाखल घेत पालकमंत्री गडाख उद्या सोमवारी उस्मानाबाद दौऱ्यावर येत आहेत. 

पालकमंत्री शंकरराव गडाख यांना 'उस्मानाबाद लाइव्ह'चे आठ प्रश्न ...


असा आहे दौरा .

26 एप्रिल रोजी गडाख हे सकाळी 9.30 वाजता अहमदनगर येथून भूम येथे ग्रामीण रुग्णालयास भेट देतील व त्यानंतर गोलेगाव येथील कोविड केअर सेंटरला भेट देणार आहेत .11.30 वाजता उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेऊन दुपारी 1 वाजता कोविड बाबत आढावा बैठक घेतील त्यानंतर 1.40 वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयात कोविड कक्षास भेट व त्यानंतर 2 वाजता जिजामाता जिजाऊ मुलींचे वसतिगृह येथे तपासणी कक्षास भेट देतील.. 


 

From around the web