पालकमंत्री शंकरराव गडाख यांना 'उस्मानाबाद लाइव्ह'चे आठ प्रश्न ...

 
पालकमंत्री शंकरराव गडाख यांना 'उस्मानाबाद लाइव्ह'चे आठ प्रश्न ...

उस्मानाबाद - उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख अखेर सोमवारी उस्मानाबादेत आले. त्यांनी  कोरोनाच्या संदर्भात एक बैठकी घेतली. यावेळी त्यांनी ऑक्सिजनचा प्रश्न सोडविण्यासाठी आणखीन चार प्लांट उभे करणार असल्याचे सांगितले. मात्र मागील वर्षीचा प्लांट आणखी सुरु झाला नाही तर प्रस्तावित प्लांट कधी सुरु होणार ? हे एक कोडेच आहे. 

यानिमित्त पालकमंत्री शंकरराव गडाख यांना आम्ही आठ प्रश्न विचारत आहोत. या प्रश्नाचे उत्तर ते देतील अशी अपेक्षा आहे. 

१ ) नवीन ऑक्सिजन प्लांट किती तारखेला चालू होईल ?

२)  काल ( सोमवारी ) पालकमंत्री आणखी चार ऑक्सिजन प्लांट चालू करू असं  म्हणाले..  मागच्या वर्षीचे  प्लांट अजून चालू नाही मग हे नवीन चार कधी पर्यंत कार्यान्वित होतील याची काही डेड लाईन ठेवली आहे का ?

३) या प्लांट मधून फक्त 10 टक्के  ऑक्सिजन ची गरज भागेल मग उर्वरीत 90 टक्के  ऑक्सिजनसाठी आणि सध्या रुग्णवाढीचा दर पाहता काय उपाययोजना आहेत ?

४)  उस्मानाबाद  शहरात 160 व्हेंटिलेटर बेड आहेत सध्या ची रुग्ण वाढीचा दर पाहता नवीन व्हेंटिलेटर मागवले आहेत का,किती मागवले आणी ते नेमके किती दिवसात कार्यान्वित होतील ? 

५) शहरात सध्या किती रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध आहेत,सध्याची गरज आणि  वाढणारी रुग्ण संख्या पाहता रोज किती इंजेक्शन आपण मागवणार आहात याचा काही डेटा आहे का  ?

६) खाजगी रुग्णालयात ऑक्सिजन संपण्याच्या घटना घडल्या आहेत,त्या घडू नये म्हणून काय उपाययोजना केल्या आहेत किंवा करणार आहात ?

७) सध्या सगळे हॉस्पिटल मधील बेड फुल आहेत, मग एखादं नवीन कोविड सेन्टर,ज्यात व्हेंटिलेटर नाही निदान ऑक्सिजन बेड असतील असे कधी चालू करणार आहात आणि किती बेड  हे चालू करणार आहात ?

८) उस्मानाबाद जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा जो काळा  बाजार सुरु आहे, त्याला पायबंद घालण्यासाठी काही पथक नियुक्त केले आहेत का ? 
 

From around the web