सर्किट हाऊसमध्ये ओली पार्टी करणाऱ्या नायब तहसीलदार राजाराम केलूरकर  यांच्यावर ठपका 

जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल, जिल्ह्याबाहेर बदलीचा प्रस्ताव 
 
s
उस्मानाबाद लाइव्हचा दणका 

उस्मानाबाद -  उस्मानाबादच्या सर्किट हाऊसमध्ये ओली पार्टी करणाऱ्या नायब तहसीलदार ( पुरवठा ) राजाराम केलूरकर यांना एक महिना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यानी याप्रकरणी गंभीर दखल घेऊन  केलूरकर यांच्यावर ठपका ठेवला आहे. तसेच केलूरकर यांच्यावर कडक ताशेरे ओढत जिल्ह्याबाहेर बदलीचा प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश आस्थापना विभागास दिले आहेत. 

 उस्मानाबादच्या  सर्कीट हाऊसमध्ये बुधवार दि. ८ जून २०२२ रोजी  रात्री नायब तहसीलदार ( पुरवठा ) राजाराम केलूरकर  यांनी  स्वस्त धान्य दुकानदारासोबत ओली पार्टी केली होती. एकीकडे उस्मानाबाद शहर आणि तालुक्यात गेले तीन महिने गहू , तांदूळ आणि साखर याचे वाटप नाही तर दुसरीकडे हे धान्य काळ्या बाजारात विकून आलेल्या पैश्यातून ओली पार्टी तेही चक्क सर्कीट हाऊसमध्ये केली जात होती. 

बुधवार दि. ८ जून रात्री 6 ते 12 पर्यंत ही ओली पार्टी सुरू होती, मटनावर ताव आणि प्यायला दारू यामुळे ही पार्टी चांगलीच रंगली होती,नायब तहसीलदार ( पुरवठा ) राजाराम केलूरकर आणि शहर आणि तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार यावेळी उपस्थित होते, आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना दरमहा हप्ता पोहच करीत असल्याने आपले कुणी वाकडे करू शकत नाही, या गुर्मीत हा धिंगाणा सुरू होता.

d


उस्मानाबाद लाइव्हने याबाबत सर्वप्रथम वृत्त दिले होते. या वृत्ताची जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर  यांनी गंभीर दखल घेऊन  नायब तहसीलदार ( पुरवठा ) केलूरकर  यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर केलूरकर यांना एक महिना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. तसेच याप्रकरणी गंभीर दखल घेऊन  केलूरकर यांच्यावर ठपका ठेवला आहे. तसेच केलूरकर यांच्यावर कडक ताशेरे ओढत जिल्ह्याबाहेर बदलीचा प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश आस्थापना विभागास दिले आहेत. 

जिल्हाधिकाऱ्यांचे असे आहेत ताशेरे... 

सर्किट हाऊस मध्ये कर्मचाऱ्यांच्या वाढदिवसाच्या पार्ट्या करणे शासकीय शिस्तीला धरून नाही तसेच सदर कार्यक्रमाला पुरवठा विभागाशी संबंधित दुकानदार उपस्थित होते, त्याबाबत सीसीटीव्ही पुरावे जोडणे आवश्यक होते तथापि या प्रकरणी केलुरकर यांच्याविरूध्द ठपका ठेवून त्याची सर्व्हिस बुकात नोंद घ्यावी तसेच सदर अधिकाऱ्याचा जिल्ह्यातील कार्यकाळ पाहता जिल्हाबाहेर बदलीचा प्रस्ताव पाठवावा. 

संबंधित बातम्या

ओली पार्टी करणाऱ्या नायब तहसीलदार राजाराम केलूरकर यांना कारणे दाखवा नोटीस

उस्मानाबादच्या सर्किट हाऊसमध्ये तहसीलच्या बड्या अधिकाऱ्याची ओली पार्टी रंगली !

उस्मानाबाद लाइव्हचा दणका ! सर्किट हाऊसमध्ये झालेल्या ओली पार्टी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

From around the web