उस्मानाबाद लाइव्हचा दणका ! सर्किट हाऊसमध्ये झालेल्या ओली पार्टी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई
उस्मानाबाद - उस्मानाबादच्या सर्किट हाऊसमध्ये ओली पार्टी करणाऱ्या नायब तहसीलदार ( पुरवठा ) राजाराम केलुरकर यांना एक महिना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे तसेच शासकीय विश्रामगृहात पार्टी करण्यास तसेच विना बुकींग थांबण्यास मज्जाव करण्याचे परिपत्रक जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी काढले आहे. उस्मानाबाद लाइव्हने याबाबत सर्वप्रथम वृत्त दिले होते.
उस्मानाबादच्या सर्किट हाऊसमध्ये तहसीलच्या बड्या अधिकाऱ्याची ओली पार्टी रंगली !
उस्मानाबादच्या सर्कीट हाऊसमध्ये बुधवार दि. ८ जून रोजी रात्री नायब तहसीलदार ( पुरवठा ) राजाराम केलुरकर यांनी स्वस्त धान्य दुकानदारासोबत ओली पार्टी केली होती.
एकीकडे उस्मानाबाद शहर आणि तालुक्यात गेले तीन महिने गहू , तांदूळ आणि साखर याचे वाटप नाही तर दुसरीकडे हे धान्य काळ्या बाजारात विकुन आलेल्या पैश्यातुन ओली पार्टी तेही चक्क सर्कीट हाऊसमध्ये केली जात आहे.
बुधवार दि. ८ जून रात्री 6 ते 12 पर्यंत ही ओली पार्टी सुरू होती, मटनावर ताव आणि प्यायला दारू यामुळे ही पार्टी चांगलीच रंगली होती,नायब तहसीलदार ( पुरवठा ) राजाराम केलुरकर आणि शहर आणि तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार यावेळी उपस्थित होते, आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना दरमहा हप्ता पोहच करीत असल्याने आपले कुणी वाकडे करू शकत नाही, या गुर्मीत हा धिंगाणा सुरू होता.
उस्मानाबाद लाइव्हने याबाबत सर्वप्रथम वृत्त दिले होते. या वृत्ताची जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी गंभीर दाखल घेऊन नायब तहसीलदार ( पुरवठा ) राजाराम केरूरकर यांना चांगलेच धारेवर धरले तसेच याप्रकरणी केलुरकर यांच्यावर कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान शासकीय विश्रामगृहात पार्टी करण्यास तसेच विना बुकिंग थांबण्यास मज्जाव करण्याचे परिपत्रक जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी काढले आहे.