उस्मानाबादच्या सर्किट हाऊसमध्ये तहसीलच्या बड्या अधिकाऱ्याची ओली पार्टी रंगली !
उस्मानाबाद - उस्मानाबादच्या सर्किट हाऊसमध्ये बुधवारी रात्री एका बड्या अधिकाऱ्यांने स्वस्त धान्य दुकानदारासोबत ओली पार्टी केल्याने शहरात चर्चेचा विषय झाला आहे.
एकीकडे उस्मानाबाद शहर आणि तालुक्यात गेले तीन महिने गहू , तांदूळ आणि साखर याचे वाटप नाही तर दुसरीकडे हे धान्य काळ्या बाजारात विकून आलेल्या पैश्यातुन ओली पार्टी तेही चक्क सर्किट हाऊसमध्ये केली जात असल्याने चर्चा रंगली आहे.
बुधवारी रात्री 6 ते 12 पर्यंत ही ओली पार्टी सुरू होती, मटनावर ताव आणि प्यायला दारू यामुळे ही पार्टी चांगलीच रंगली होती, तहसिलचा एक बडा अधिकारी आणि शहर आणि तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार यावेळी उपस्थित होते, आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना दरमहा हप्ता पोहच करीत असल्याने आपले कुणी वाकडे करू शकत नाही, या गुर्मीत हा धिंगाणा सुरू होता.
8 जून ( बुधवार ) रोजी सायंकाळी 6 ते 12 पर्यंत सर्किट हाऊसचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तर या पार्टीत कुणी कुणी सहभागी झाले होते, हे स्पष्ट होईल. वरीष्ठ अधिकाऱ्यानी याची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.