सक्षणा सलगर यांचा हा तर पब्लिसिटी स्टंट ...
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी वादळी वातावरणात पार पडली. यावेळी आरोप - प्रत्यारोपाची धुळवड पहावयास मिळाली. भाजपच्या नेत्या आणि जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चना पाटील यांच्यावर राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्ष आणि झेडपी सदस्या सक्षणा सलगर यांनी घणाघाती आरोप केला.
अर्चना पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहाला निधी न देता, स्वतःच्या कॅबीनवर लाखो रुपयाचा खर्च केला तसेच शासकीय गाडीचा वापर चहाच्या कॅटल्या ठेवण्यासाठी केला, असा आरोप सक्षणा सलगर यांनी माध्यमाशी बोलताना केला . सर्वसाधारण सभेतही त्यांनी अर्चनाताईवर अनेक आरोप केले.
अर्चना पाटील यांनी कॅबीनवर लाखो रुपयाचा चुराडा केला
या आरोपावर अर्चना पाटील यांनी प्रतिक्रिया नोंदवण्यास नकार दिला. त्यांचे स्वीय सहाय्यक यांनी म्हटले की, ताई यावर कोणतेही भाष्य करणार नाहीत. काही लोकांना पब्लिसिटी स्टंट करण्याची सवय आहे. ताईवर आरोप केले म्हणजे वृत्तपत्रात नाव येते आणि चॅनलवर झळकता येते, असा त्यांचा समज आहे.म्हणून खोटे आरोप केले जातात. जनतेला सर्व माहित आहे, जनता योग्य वेळी निर्णय घेईल.
अर्चना पाटील यांच्यावर आरोप केल्यानंतर सक्षणा सलगर चांगल्याच ट्रोल झाल्या आहेत. नेटिझन्सनी सक्षणा सलगर यांच्यावर अनेक प्रश्न उभे केले आहेत. त्यासाठी उस्मानाबाद लाइव्हचे फेसबुक पेज पाहा ..