अर्चना पाटील यांनी कॅबीनवर लाखो रुपयाचा चुराडा केला 

शासनाच्या गाडीत चहाच्या कॅटल्या ठेवल्या 
 
s
जिल्हा परिषद सदस्या सक्षणा सलगर यांचा घणाघाती आरोप 

उस्मानाबाद - राष्ट्रवादीच्या  युवती प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्या सक्षणा सलगर यांनी आज  जिल्हा परिषद माजी उपाध्यक्षा  अर्चना पाटील यांच्यावर घणाघाती आरोप केला. अर्चना पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहाला निधी न देता, स्वतःच्या कॅबीनवर लाखो रुपयाचा खर्च केला तसेच शासकीय गाडीचा वापर चहाच्या कॅटल्या ठेवण्यासाठी केला, असा आरोप त्यांनी केला . 

आज  ( गुरुवार )  रोजी  जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधक आज आमने- सामने आले होते. हमरी  -  तुमरी आणि अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला, सक्षणा सलगर यांनी अर्चनाताईच्या पीएला बाहेर हाकलले तरअध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी सक्षणा सलगर यांच्या अंगरक्षकांना बाहेर हाकलले. खुन्नस / आरोप - प्रत्यारोप यांनी सभा वादळी ठरली..

 सक्षणा सलगर यांनी माजी उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई  पाटील यांचे स्वीय सहाय्यक इर्शाद काझी यांना सभागृहाच्या बाहेर काढण्यासाठी हट्टाहास केला , त्यामुळे काझी यांना बाहेर जावे लागले. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिताताई कांबळे यांनी  सक्षणा सलगर  यांचे अंगरक्षक असलेल्या दोन पोलिसांना बाहेर काढले... झेडपीच्या सर्वसाधारण सभेत अशी खुन्नस पहिल्यांदा पहावयास मिळाली. 

जिल्हा परिषदेची सभा पार पडल्यानंतर राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्या सक्षणा सलगर यांनी अर्चना पाटील यांच्यावर  विविध आरोप करून , सर्वसामान्य कार्यकर्त्याची आ. राणा जगजितसिंह पाटील आणि त्यांच्या पत्नी अर्चना पाटील या गळचेपी करीत असल्याचा आरोप केला. 


अर्चनाताई विरुद्ध सक्षणा यांच्यात सामना रंगणार 

अर्चनाताई विरुद्ध सक्षणा यांच्यातील सामना आता जिल्हा  परिषदेच्या तेर गटात रंगणार आहे. या गटात हायहोल्टेज लढत होईल, अशीच चिन्हे आहेत.. अर्चनाताई पाटील या भाजप आमदार राणा  पाटील यांच्या पत्नी आहेत तर सक्षणा सलगर या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष आहेत. त्यांना खासदार सुप्रिया सुळे यांचा वरदहस्त आहे. 

विशेष म्हणजे सक्षणा सलगर यांना आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनीच  राजकारणात  ब्रेक दिला होता. सलगर यांना पाडोळी मतदारसंघातून निवडून आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते, पण राणा जगजितसिंह हे राष्ट्रवादी सोडून भाजपात गेल्याने सक्षणा सलगर यांनी विरोधात भूमिका घेतली आहे. 

From around the web