उस्मानाबाद लाइव्ह दणका : टाकळीच्या अंगणवाडीमधील निकृष्ट THR किटची तपासणी

 
उस्मानाबाद लाइव्ह दणका : टाकळीच्या अंगणवाडीमधील निकृष्ट THR किटची तपासणी

उस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यातील अंगणवाडीला वाटप करण्यात आलेल्या  THR किटमधील गव्हामध्ये   उंदराच्या लेंड्या, केस, जाळी आळी, नुशी आणि माती आढळल्याची बातमी उस्मानाबाद लाइव्हने प्रकाशित करताच, प्रशासनाला जग आली असून, त्याची चौकशी सुरु झाली आहे. 


उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी मध्ये प्रत्येक महिनेला THR किटचे वाटप केले जाते, मात्र उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी(बें) येथे  जानेवारी महिन्याच्या  THR किटमध्ये  गव्हामध्ये उंदराच्या उंदराच्या लेंड्या, केस, जाळी आळी, नुशी आणि माती आढळून आल्या होत्या. याबाबत उस्मानाबाद लाइव्हने  बातमी प्रकाशित केल्यानंतर  बाल विकास प्रकल्प अधिकारी अनिल कांबळे यांनी बातमीची दखल घेऊन  पाडोळी(आ) विभागाच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती व्ही.व्ही.सुकाळे यांना चौकशी करण्याबाबतचे पत्र काढले होते.

त्याबाबतचा तपास करण्यासाठी आज  (दि.२०) अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती व्ही.व्ही.सुकाळे यांनी टाकळी(बें) येथील अंगणवाडीस भेट देऊन किटची तपासणी केली असता गव्हामध्ये उंदराच्या लेंड्या आणि केस नुशी  आढळून आल्या आहेत. यावेळी निकृष्ट किट ह्या संबंधित ठेकेदारास परत घेऊन जाण्यास सांगितले असून परत उत्कृष्ट आणि सकस किट देण्यात यावे म्हणून संबंधित ठेकेदारास सांगितले असल्याचे बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री. कांबळे यांनी सांगितले. संबंधित ठेकेदारास असा प्रकार परत घडू नये म्हणून सूचना ही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.मात्र निकृष्ट किट दिल्याप्रकरणी काय कारवाई होणार ? हे अजून स्पष्ट झालेले नाही. 

यापूर्वीचे वृत्त 

उस्मानाबाद तालुक्यातील अंगणवाडीना निकृष्ट दर्जाच्या THR किट वाटप

From around the web