उस्मानाबाद तालुक्यातील अंगणवाडीना निकृष्ट  दर्जाच्या THR किट वाटप 

 
उस्मानाबाद तालुक्यातील अंगणवाडीना निकृष्ट  दर्जाच्या THR किट वाटप

पाडोळी - उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी मध्ये प्रत्येक महिनेला THR किटचे वाटप केले जाते. या किट गरोदर आणि स्तनदा मातांना  देण्यात येत असतात. या किटमध्ये गव्हू,मसूर डाळ, हरभरा,सोयाबीन तेल, हळद,मिर्ची पावडर,मिठ आदी सामुग्री दिल्या जातात. 

मात्र जानेवारी महिन्यात देण्यात येत असलेल्या किटमधील गव्हू, मसूर डाळ आणि हरभरामध्ये मोठ्या प्रमाणात उंदराच्या लेंड्या, केस, जाळी आळी, नुशी आणि माती दिसून येत आहेत. त्यामुळे येथील स्तनदा आणि गरोदर मातेच्या आरोग्याशी संबंधित विभाग खेळ खेळत असल्याचे दिसून येत आहे.

या  किट उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी(बेंबळी ) सह तालुक्यातील अन्य गावात ही वाटप करण्यात आले आहेत.पूर्वी सर्व वस्तू या  पॅकिंगमध्ये मध्ये येत होत्या यावेळेस मात्र खुल्या करून साधारण कॅरी बॅग मध्ये बांधून देण्यात आल्या आहेत, त्यामुळे संबंधित किट मध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे . 
 

From around the web