उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विमा जमा होण्यास सुरुवात 

उस्मानाबाद लाइव्हचे वृत्त तंतोतंत खरे ठरले... 
 
s

उस्मानाबाद -उस्मानाबाद लाइव्हचे वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विमा जमा होण्यास सुरुवात  झाली आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या खात्यावर पीक विमा कधी जमा होणार ? याची उत्सुकता लागली आहे. 


उस्मानाबाद जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत अतिवृष्टीमुळे  शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. खरीप २०२१ मध्ये झालेल्या पीक नुकसानीपोटी मंजुर विमा सोमवार दि.६ डिसेंबरपासून  शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात होणार असल्याचे बजाज अलायन्झ कंपनीच्या कृषी विभागाचे देशाचे प्रमुख आशिष अग्रवाल यांनी आश्वासीत केले होते. याबाबतचे वृत्त उस्मानाबाद लाइव्हने सर्वात प्रथम दिले होते. 

गुड न्यूज : सोमवारपासून पीक विमा बँक खात्यावर जमा होणार...

उस्मानाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आज पीक विमा जमा झाला आहे. एका शेतकऱ्याला ६५ हजार, एका शेतकऱ्याला ४८ हजार, एका शेतकऱ्याला ३२ हजार जमा झाल्याचा पुरावा सोबत जोडला आहे. 

# पीक विमा कुणाला मिळणार ?

- ज्यांनी पीक विमा भरला आहे आणि नंतर नुकसान झाल्यानंतर ऑनलाईन किंवा ऑफलाईन तक्रार नोंदवली त्यांनाच मिळत आहे.

# सरसगट विमा मिळणार का ?

- हे अजून स्पष्ट झालेले नाही....

d


 

d

d

From around the web