गुड न्यूज : सोमवारपासून पीक विमा बँक खात्यावर जमा होणार...

उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी  १५ ते १८ हजार 
 
zz

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत अतिवृष्टीमुळे  शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता, त्यांच्या  बँक खात्यावर  सोमवारपासून पीक विमा जमा होणार आहे. 

खरीप २०२१ मध्ये झालेल्या पीक नुकसानीपोटी मंजुर विमा सोमवार दि.६ डिसेंबरपासून  शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात होणार असल्याचे बजाज अलायन्झ कंपनीच्या कृषी विभागाचे देशाचे प्रमुख आशिष अग्रवाल यांनी आश्वासीत केले आहे. नुकसान भरपाईची रक्कम प्रति हेक्टर  साधारणत १५ ते १८ हजारच्या दरम्यान राहणार आहे. 

पावसातील खंड व अतिवृष्टीमुळे खरीप २०२१ मध्ये पीकांचे प्रचंड नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना हक्काची नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे, असे आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितले, दरम्यान खरीप २०२० च्या पीक विमा बाबतची उच्च न्यायालयात  सुनावणी ७ डिसेंबर रोजी असल्याचेही त्यांनी सांगितले, 

From around the web