शिवसैनिक बाळासाहेब देशमुख अपघात प्रकरणी गुन्हा दाखल 

 
Osmanabad police

उस्मानाबाद   : चालक- सुरज व्यंकट शिंदे, रा. उस्मानाबाद यांनी दि. 20 ऑगस्ट रोजी 02.15 वा. सु. उस्मानाबाद येथील अजमेरा तुरटी कारखान्याजवळील रस्त्यावर चारचाकी वाहन क्र. एम.एच. 25 आर 6818 ही निष्काळजीपने चालवल्याने ती अनियंत्रीत होउन रस्त्याबाजूस जाउन पलटली. या अपघातात वाहनातील बाळासाहेब ज्ञानदेव देशमुख हे मयत होउन संजय मुंढे यांसह चालक शिंदे हे गंभीर जखमी झाले. यावरुन भा.दं.सं. कलम- 304 (अ), 279, 337 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शिवसैनिक बाळासाहेब देशमुख यांचे अपघाती निधन

उमरगा  : माडज येथील रुक्मीन कुंभार व त्यांची 11 वर्षीय मुलगी- वैष्णवी या दोघी दि. 18 ऑगस्ट रोजी 15.30 वा. सु. उमरगा- आलुर रस्त्यावरील माने पेट्रोलियम विक्री केंद्राजवळील रस्त्याने पायी जात होत्या. दरम्यान अज्ञात चालकाने बोलेरो वाहन क्र. एम.एच. 24 व्हि 7832 निष्काळजीपने चालवून त्या माय- लेकीस समोरुन धडक दिल्याने त्या दोघी किरकोळ- गंभीर जखमी झाल्या. अशा मजकुराच्या रुक्मीन कुंभार यांनी दि. 20 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


चोरी

उस्मानाबाद : साजीत शेख, रा. उस्मानाबाद यांनी त्यांची होंडा शाईन मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एक्यु 6782 ही दि. 18 ऑगस्ट रोजी 17.30 ते 18.00 वा. दरम्यान जुना बस डेपोच्या कार्यशाळेजवळ लावली असता ती अज्ञाताने चोरुन नेली. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी  : देविदास नाळपे, रा. जवळका, ता. वाशी यांनी त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 ए 9962 ही वाशी येथील भगवंत इलेक्ट्रीकल्स दुकानासमोर लावली असता ती दि. 12 ऑगस्ट रोजी च्या पहाटे 04.30 वा. सु. अज्ञाताने चोरुन नेली. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 अपहरण 

उस्मानाबाद -  एक 16 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 17- 18 ऑगस्ट च्यारात्री घरातील कुटूंबीय झोपेत असतांना ती घरातून गुपचूपने निघून गेली. कुटूंबीयांनी तीचा शोध घेतला असता नात्यातीलच एका तरुणाने अज्ञात कारणासाठी तीचे अपहरन केले असावे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या पित्याने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web