उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी यांच्या दोन गुंडानी धमकी दिल्याची तक्रार दाखल 

 
उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी यांच्या दोन गुंडानी धमकी दिल्याची तक्रार दाखल

उस्मानाबाद - उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी  यांच्याविरुद्धची तक्रार मागे घे, अन्यथा तुला जीवे मारण्यात येईल, अशी धमकी दोन अज्ञात गुंडानी दिल्याची तक्रार अभिजित पतंगे यांनी  उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली आहे. 

कोव्हीडचे नियम पायदळी तुडवत तहसीलदार गणेश माळी यांचा उस्मानाबाद तहसील  कार्यालयात ३ मार्च रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला होता, त्याची तक्रार अभिजित पतंगे यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे ४ मार्च रोजी  केली आहे. 

कोव्हीडचे नियम पायदळी तुडवत तहसीलदार गणेश माळी यांचा शासकीय कार्यालयात वाढदिवस साजरा

त्यामुळे तहसीलदार गणेश माळी  यांचे दोन अज्ञात गुंडानी आज अभिजित पतंगे यांना  जीवे मरण्याची धमकी दिली. पतंगे हे सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता आंबेडकर पुतळ्याजवळील पुलावरून जात असताना, दोन अज्ञात गुंड  चार चाकी वाहनातून आले आणि त्यांनी ,तक्रार मागे घे अन्यथा तुला जीवे मारण्यात येईल,तसेच तुला कोणत्या तरी प्रकरणात अडकवण्यात येईल, अशी धमकी देऊन निघून गेले. 

याप्रकरणी पतंगे यांनी उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी ५०४, ३४ नुसार अदखलपात्र तक्रार नोंदवली आहे. 

From around the web