उस्मानाबादेत दोन गटांत झेंडा लावण्यावरून तुफान दगडफेक

झेंडा काढण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक , सहा पोलीस कर्मचारी जखमी 
 
d

उस्मानाबाद - उस्मानाबाद शहरातील विजय चौक भागात मंगळवारी  रात्री दोन गटांत  झेंडा लावण्यावरून तुफान दगडफेक झाली. त्यानंतर दोन्ही झेंडे  काढण्यासाठी पोलीस गेले असता, त्यांच्यावरही जमावाने दगडफेक केली, त्यात सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. याप्रकरणी ४३ प्रमुख आरोपीसह १५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शहरातील विजय चौकात दरवर्षी नवरात्र महोत्सवानिमित्त झेंडा लावला जातो, त्यात दुसऱ्या समुदायाचा सण आल्याने त्यांनीही या चौकात त्याच झेंडाच्या ठिकाणी झेंडा लावला, यावरून तणाव निर्माण होवून मंगळवारी  रात्री ( कोजागिरी पौर्णिमा ) दोन गटात  तुफान दगडफेक झाली. त्यात काही वाहनाचे आणि दुकानाचे नुकसान झाले. त्यात एकाने फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याने तणावात अधिक भर पडली. 

d

त्यानंतर शहर पोलीस याठिकाणी गेले असता,  त्यांच्यावरही जमावाने  दगडफेक केली, त्यात पोलीस निरीक्षक सुर्वे, पोहेकॉ शिंदे, पोना चव्हाण, गोरे, आदी सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. 

याप्रकरणी पोलिसांनी भादंवि ३०७, ३३३, ३५३, १४३, १४७,१४८ आदी कलमानुसार ४३ प्रमुख आरोपीसह दीडशे जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच या चौकात दंगल नियंत्रक पथक तैनात करण्यात आले आहे.सध्या या चौक भागात तणाव असला तरी शांतता आहे. पोलिसांनी अफवेवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केलं आहे. 

यामुळे पोलिसांवर दगडफेक 

उस्मानाबाद शहरातील एका तरुणाने फेसबुकवर आक्षेपार्ह लिहिली होती, त्या तरुणावर कारवाई करावी म्हणून आठ ते दहा लोक शहर पोलीस स्टेशन मध्ये गेले होते. त्यानंतर काही पोलीस त्या तरुणाला अटक करण्यासाठी गेले होते पण तो तरुण न सापडल्याने परत आले. त्यामुळे ते आठ ते दहा  लोक संतप्त झाले आणि विजय चौकात जाऊन बंदोबस्तासाठी उभ्या असलेल्या पोलिसांवर दगडफेक केली. त्यात सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

पोलिसांवर झालेल्या दगडफेक प्रकरणी 'या' लोकांवर गुन्हा दाखल  

Video 

From around the web