पोलिसांवर झालेल्या दगडफेक प्रकरणी 'या' लोकांवर गुन्हा दाखल 

उस्मानाबाद पोलिसांची दिले दगडफेकीचे स्पष्टीकरण
 
s

उस्मानाबाद -  उस्मानाबाद शहरातील विजय चौकात  झेंडा लावण्यावरून मंगळवारी  रात्री तणाव निर्माण झाला, त्यानंतर याप्रकरणी  एकाने फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट पोस्ट लिहिल्याने  या तणावात अधिक भर पडली. यावरून जमावाने पोलिसांवर दगडफेक केली, त्यात सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले. या संपूर्ण प्रकरणी पोलीसांनी जवळपास १५० लोकांवर गुन्हा दाखल केला आहे, तसेच दगडफेकीचे  स्पष्टीकरण दिले आहे. 

उस्मानाबाद येथील आकाश चौधरी याने सामाजिक प्रसार माध्यमावर आक्षेपार्ह मजकुर टाकल्याने दि. 19 ऑक्टोबर रोजी 21.20 वा. सु. उस्मानाबाद (श.) पो.ठा. येथे 1)बिलाल खलील शेख 2)बब्बु मुजावर 3)फय्याज शेख 4)असलम शेख 5)अकबर मुजावर 6)ईस्माईल शेख 7)बाबा मुजावर 8)जाफर मुजावर 9)शहानवाज पटेल 10)बबलु बागवान 11)शाहबाज  12)तौफीक शेख 13)इरशाद शेख 14)असलम मुजावर 15)सद्दाम मुजावर 16)इरशाद शेख 17)सैफ शेख 18)अमन शेख 19)फारुक शेख 20)शुकूर मनियार सर्व रा. उस्मानाबाद यांसह सुमारे 80 व्यक्तींचा जमाव आला होता. 

यावेळी पोलीस पथकाने सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आकाश चौधरी चा शोध घेतला असता तो पथकास न आढळल्याने पथक पोलीस ठाण्यात शासकीय वाहनाने परत आले. यावेळी आकाश हा पोलीस वाहनात असल्याचा जमावाचा समज झाल्याने त्यांनी पोलीस वाहनास घेराव करुन वाहनावर बुक्या, दगड मारण्यास सुरुवात केली. यावर पोलीसांनी जमावास समजावून कायदा व सुव्यवस्था राखन्याचे आवाहन केले. नंतर जमावातील लोक विजय चौकाच्या दिशेने निघून गेले. यावर तो जमाव विजय चौकात जाउन गोंधळ करण्याची शक्यता असल्याने पोलीसांनी पोलीस मुख्यालयातील दंगा काबू पथकासह विजय चौकात गेले असता त्या ठिकाणी नमूद लोकांसह सुमारे 150 लोक बेकायदेशीर जमाव जमूवन परिसरातील घरांवर दगड फेक करुन आरडाओरड करत तसेच शिवीगाळ करत असल्याचे दिसले.

यापूर्वीचे वृत्त उस्मानाबादेत दोन गटांत झेंडा लावण्यावरून तुफान दगडफेक

यावर पोलसांनी पोलीस वाहनावरील ध्वनीक्षेपकाद्वारे जमावास उद्बोधीत कारुन सोशल माध्यमावरील त्या प्रकरणातील संबंधीतावर कारवाई करण्याचे आश्वासीत केले. परंतु जमाव ऐकत नसल्याने पोलीसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वाजवी बळाचा वापर करुन जमावास पांगविले. यावेळी जमावाने केलेल्या दगड फेकीत उस्मानाबाद (श.) पो.ठा. चे पोहेकॉ- कचरे गंभीर जखमी होउन सपोनि- सुर्वे, पोहेकॉ- शिंदे,पोना- बिरमवार, चव्हाण, पोकॉ- गोरे, दंगा काबू पथकाचे अंमलदार- जाधव, चंचलवाड हे किरकोळ जखमी झाले. अशा प्रकारे नमूद जमावाने पोलीसांच्या शासकीय कर्तव्यात जाणीवपुर्वक दगड फेक करुन अडथळा केला व पोलीसांच्या तसेच जनतेच्या वाहनांचे आर्थिक नुकसान केले.

यावरून पोना- सायलू बिरमवार यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद जमावातील लोकांविरुध्द भा.दं.सं. कलम- 353, 307, 332, 333, 143, 147, 148, 149, 294, 186 सह सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक कायदा कलम- 3 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web