कोरोनाचे थैमान : उस्मानाबादेत एकाच दिवशी १९ मृतदेहांवर अंत्यसंकार 

स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा पुरत नसल्यामुळे गुरुवारी  ८ मृतदेहांवर अंत्यसंकार 
 
कोरोनाचे थैमान : उस्मानाबादेत एकाच दिवशी १९ मृतदेहांवर अंत्यसंकार

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या ७२ तासात २१ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मंगळवार दि. १३ एप्रिल रोजी सात तर बुधवार दि. १४ एप्रिल रोजी १४ जणांचा कोरोनामुळे  मृत्यू झाला. त्यामुळे उस्मानाबादच्या कपिलधारा  स्मशानभूमीत आज कधी न पाहिलेले चित्र पाहायला मिळाले आहे. एकाचवेळी  १९ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा पुरत नसल्यामुळे ८ मृतदेहांवर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


 उस्मानाबाद जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे.  कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही चिंताजनक बनत आहे. इतकच काय तर सरण रचण्यासाठी लाकडं कमी पडत आहेत. त्यामुळे कमी लाकडांवरच मृतदेहांवर अंत्यविधी केले जात आहेत. उस्मानाबादचे हे चित्र पाहून अनेकांना रडू देखील कोसळल्याचे पाहायला मिळाले.बुधवारी एकाच वेळी १९मृतदेहांवर अंत्यसंकार  करण्यात आले.  हे चित्र पाहून स्मशानभूमी देखील गहिवरली असेल .

 

आकड्यांमध्ये तफावत
पालिकेच्या व आरोग्य विभागाच्या काही कर्मचाऱ्यांकडून कोराेना काळात निश्चितच उल्लेखनीय, कौतुकास्पद कामगिरी केली जात आहे. मात्र काही कर्मचारी सारी किंवा अन्य आजाराने मृत्यू पावलेल्या रुग्णांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्याऐवजी नगरपालिकेच्या ताब्यात देतात. त्यामुळे त्यांच्यावरही कोरोनाच्या निकषानुसार पालिकेच्या खर्चातून अंत्यसंस्कार होत आहेत. वास्तविक कोरेाना निगेटिव्ह आलेल्या रूग्णांचे मृतदेह संबंिधत नातेवाइकांच्या ताब्यात देणे अपेक्षित आहे.रुग्णालयाकडून दररोजच्या कोरेाना रुग्णांची व मृत्यूबद्दलची माहिती दिली जाते. या आकडेवारीत आणि दररोज पालिकेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या अंत्यसंस्काराच्या आकडेवारीत मोठी तफावत असते. नॉनकोविड रूग्णांवर अंत्यसंस्कार केले जात असल्याने असा फरक पडतो.

२७ पैकी सात रुग्ण पॉझिटिव्ह
जिल्हा रूग्णालयाकडून पालिकेच्या ताब्यात देण्यात आलेल्या २७ पैकी सातच रूग्ण कोरेाना पॉझिटिव्ह होते. अन्य रुग्ण कोरोना निगेटिव्ह होते. अशा निगेटिव्ह रुग्णांच्या मृतदेहावर नातेवाइकही अंत्यसंस्कार करू शकतात.
- हरिकल्याण यलगट्टे, मुख्याधिकारी, नगर परिषद

नातेवाइकांना सर्टिफिकेट दाखवण्याच्या सूचना
काही नातेवाइकांमध्ये कोरोनाबद्दलची भीती असल्याने निगेटिव्ह आलेल्या रुग्णांचेही मृतदेह स्विकारले जात नाहीत, हे खरे आहे. मात्र, नातेवाइकांची शंका दूर व्हावी, यासाठी आता कोरोना निगेटिव्ह रुग्णांच्या मृत्यूचे सर्टिफिकेट नातेवाईकांना दाखवा,अशा सूचना करण्यात आल्या अाहेत.
 -कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हाधिकारी

निगेटिव्ह रुग्णांचे मृतदेह नातेवाइकांकडे देणार
बुधवारी अंत्यसंस्कार झालेल्यापैकी सगळे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह नाहीत. उर्वरित निगेटिव्ह आलेल्या रुग्णांचे मृतदेह नातेवाईक घेण्यासाठी तयार होत नाहीत. अन्य अाजाराने मृत्यू झालेल्या रूग्णांवर अंत्यसंस्कार केल्यास काेणताही धेाका नसतो, हे नातेवाइकांना समजावून सांगणार आहोत.
 -डॉ.डी.के.पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक,

उस्मानाबाद जिल्ह्यातील  कोरोना स्थिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा 

कोरोनाचा विस्फोट : उस्मानाबाद जिल्ह्यात १४ एप्रिल रोजी ६१३ पॉजिटीव्ह, चौदा मृत्यू

From around the web