कोरोनाचा विस्फोट : उस्मानाबाद जिल्ह्यात १४ एप्रिल रोजी ६१३ पॉजिटीव्ह, चौदा मृत्यू
जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णाची संख्या ५१५६
Apr 14, 2021, 22:14 IST

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. आज १४ एप्रिल ( बुधवार ) रोजी तब्बल ६१३ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ३८३ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात चौदा कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ५१५६ झाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत २७ हजार ८० रुग्णाची नोंद झाली असून, पैकी २१ हजार २६७ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ६५७ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.