सामाजिक माध्यमांवर अक्षेपार्ह मजकूर प्रसारीत करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल
उस्मानाबाद - सामाजिक माध्यमांवर अक्षेपार्ह मजकुर , छायाचित्र प्रसारीत करणाऱ्या दोघांवर उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उस्मानाबाद शहरातील विजय चौकात मंगळवारी रात्री दोन गटात दगडफेक झाली होती. त्यात दोघांनी सामाजिक माध्यमांवर अक्षेपार्ह मजकूर प्रसारीत केल्यामुळे तणाव अधिक वाढला होता. त्यातून पोलिसांवर देखील दगडफेक झाली होती. त्यात आठ पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.
आकाश विलास चौधरी व दिनेश तुपे, दोघे रा. उस्मानाबाद यांनी समाजात धार्मीक तेढ निर्माण होईल असे अपशब्द वापरलेला मजकुर, छायाचित्र फेसबुक या सामाजिक प्रसार माध्यमावर दि. 19 ऑक्टोबर रोजी प्रसारीत केले. अशा मजकुराच्या कादर मोहमदअली खान, रा. उस्मानाबाद यांनी दि. 20 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 153 (अ), 505, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
दीडशे जणांवर गुन्हा दाखल
विजय चौक दगडफेक तसेच पोलिसांवर झालेल्या दगडफेक प्रकरणी जवळपास दीडशे लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करताना सन २०१८ मध्ये झालेल्या दगडफेकीतील अनेक लोक आहेत. पैकी चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हा दाखल होताच, अनेकजण फरार झाले आहेत.
उस्मानाबाद येथील आकाश चौधरी याने सामाजिक प्रसार माध्यमावर आक्षेपार्ह मजकुर टाकल्याने दि. 19 ऑक्टोबर रोजी 21.20 वा. सु. उस्मानाबाद (श.) पो.ठा. येथे 1)बिलाल खलील शेख 2)बब्बु मुजावर 3)फय्याज शेख 4)असलम शेख 5)अकबर मुजावर 6)ईस्माईल शेख 7)बाबा मुजावर 8)जाफर मुजावर 9)शहानवाज पटेल 10)बबलु बागवान 11)शाहबाज 12)तौफीक शेख 13)इरशाद शेख 14)असलम मुजावर 15)सद्दाम मुजावर 16)इरशाद शेख 17)सैफ शेख 18)अमन शेख 19)फारुक शेख 20)शुकूर मनियार सर्व रा. उस्मानाबाद यांसह सुमारे 80 व्यक्तींचा जमाव आला होता.
यावेळी पोलीस पथकाने सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आकाश चौधरी चा शोध घेतला असता तो पथकास न आढळल्याने पथक पोलीस ठाण्यात शासकीय वाहनाने परत आले. यावेळी आकाश हा पोलीस वाहनात असल्याचा जमावाचा समज झाल्याने त्यांनी पोलीस वाहनास घेराव करुन वाहनावर बुक्या, दगड मारण्यास सुरुवात केली. यावर पोलीसांनी जमावास समजावून कायदा व सुव्यवस्था राखन्याचे आवाहन केले. नंतर जमावातील लोक विजय चौकाच्या दिशेने निघून गेले. यावर तो जमाव विजय चौकात जाउन गोंधळ करण्याची शक्यता असल्याने पोलीसांनी पोलीस मुख्यालयातील दंगा काबू पथकासह विजय चौकात गेले असता त्या ठिकाणी नमूद लोकांसह सुमारे 150 लोक बेकायदेशीर जमाव जमूवन परिसरातील घरांवर दगड फेक करुन आरडाओरड करत तसेच शिवीगाळ करत असल्याचे दिसले.
यावर पोलसांनी पोलीस वाहनावरील ध्वनीक्षेपकाद्वारे जमावास उद्बोधीत कारुन सोशल माध्यमावरील त्या प्रकरणातील संबंधीतावर कारवाई करण्याचे आश्वासीत केले. परंतु जमाव ऐकत नसल्याने पोलीसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वाजवी बळाचा वापर करुन जमावास पांगविले. यावेळी जमावाने केलेल्या दगड फेकीत उस्मानाबाद (श.) पो.ठा. चे पोहेकॉ- कचरे गंभीर जखमी होउन सपोनि- सुर्वे, पोहेकॉ- शिंदे,पोना- बिरमवार, चव्हाण, पोकॉ- गोरे, दंगा काबू पथकाचे अंमलदार- जाधव, चंचलवाड हे किरकोळ जखमी झाले. अशा प्रकारे नमूद जमावाने पोलीसांच्या शासकीय कर्तव्यात जाणीवपुर्वक दगड फेक करुन अडथळा केला व पोलीसांच्या तसेच जनतेच्या वाहनांचे आर्थिक नुकसान केले.
यावरून पोना- सायलू बिरमवार यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद जमावातील लोकांविरुध्द भा.दं.सं. कलम- 353, 307, 332, 333, 143, 147, 148, 149, 294, 186 सह सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक कायदा कलम- 3 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.