उस्मानाबादेतील १५ वर्षांच्या मतिमंद मुलीवर परप्रांतीय चार जणांचा आळीपाळीने अत्याचार

मुव्हमेंट फॉर पिस अँड जस्टीस वेलफेयर वतीने तीव्र शब्दात निषेध
 
उस्मानाबादेतील १५ वर्षांच्या मतिमंद मुलीवर परप्रांतीय चार जणांचा आळीपाळीने अत्याचार
या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रैक कोर्ट  न्यायालयात करून आरोपीला फाशीची  शिक्षा देण्यात  यावी - मागणी 

उस्मानाबाद - उस्मानाबाद शहरातील  अल्पसंख्याक समाजातील एका १५ वर्षांच्या मतिमंद मुलीवर परप्रांतीय चार  जणांनी आळीपाळीने अत्याचार केला. याप्रकरणी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसानी दोन आरोपीना अटक केली असून दोन आरोपी फरार आहेत. 


या घटनेचा मुव्हमेंट फॉर पिस अँड जस्टीस वेलफेयर वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यामार्फत निवेदन पाठवण्यात आले आहे. 

निवेदनात या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रैक कोर्ट  न्यायालयात करून आरोपीला फाशीची  शिक्षा देण्यात  यावी व पीडित  परिवाराला आर्थिक मदत  करून  न्याय  द्यावा अशी मागणी करण्यात  आली आहे.  

या निवेदनावर मूव्हमेंट फॉर पिस अँड जस्टिस वेलफेयरचे जिल्हा सचिव. असिफ शेख , शहराध्यक्ष  एजाज बागवान. शहर सचिव असिफ  रझवी .मुजाहिद  सिद्दीकी व  काही मुस्लिम महिला उपस्थित होत्या. 


उस्मानाबादेतील एका मतिमंद मुलीवर दोन जणांचा लैंगिक अत्याचार

From around the web