उस्मानाबादेतील एका मतिमंद मुलीवर दोन जणांचा लैंगिक अत्याचार

 
उस्मानाबादेतील एका मतिमंद मुलीवर दोन जणांचा लैंगिक अत्याचार

उस्मानाबाद : उस्मानाबाद शहरातील एका १५ वर्षांच्या मतिमंद मुलीवर दोन जणांनी आळीपाळीने अत्याचार केला. याप्रकरणी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शहरातील १५ वर्षीय मुलगी घरातून निघून गेली म्हणून आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये हरवल्याची तक्रार दाखल होती. याच मुलीवर गल्लीतच दोन युवकांनी दि. 16 व 17 जानेवारी रोजी गल्लीतीलच एका पत्रा शेडमध्ये नेउन तीच्यावर लैंगीक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. 

मुलगी मतिमंद असून, चार जणांनी अत्याचार केल्याचा आरोप मुलीच्या आई- वडिलांनी केला आहे. मात्र पोलिसांनी दोन जणांविरुद्ध  भा.दं.सं. कलम- 363, 366, 376 आणि पोक्सो कायदा कलम- 4, 6, 12 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे. 

“मारहाण.”

उस्मानाबाद (श.): प्रतिमा शिनगारे, रा. बालाजीनगर, उस्मानाबाद या 17 जानेवारी रोजी 16.30 आपल्या आईसह आपल्या राहत्या घरी होत्या. यावेळी परिसरातील 1)रमेश यादव 2)कल्पना यादव 3)बापू भडंगे 4)सखुबाई भडंगे 5)कल्पना भडंगे 6)लोंढे बाई 7)बबड्या लोंढे यांनी भुखंडाच्या वादावरुन प्रतिमा शिनगारे यांसह त्यांच्या आईस शिवीगाळ करुन दगड, काठीने मारहाण करुन जखमी केले.

From around the web