उस्मानाबादचे माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय समिती गठीत 

सन 2016 ते डिसेंबर 2021 तसेच 2012 ते 2015 या  कालावधतील झालेल्या गैरव्यवहाराचे  स्पेशल ऑडिट होणार 
 
ninbaalkar
उस्मानाबाद लाइव्हचा दणका 

उस्मानाबाद -  उस्मानाबाद नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्यासाठी उमरगा नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती राजेनिंबाळकर यांच्या काळात झालेल्या अनियमित आणि भ्रष्ट कारभाराचे स्पेशल ऑडिट करून जिल्हाधिकाऱ्याकडे आपला अहवाल सादर करणार आहे. 


उस्मानाबाद नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या 2016 ते डिसेंबर 2021 या कालावधीतील तसेच 2012 ते 2015 या प्रभारी अध्यक्षपदाच्या कालावधतील कारभाराची चौकशी करुन स्पेशल ऑडिट करण्याची मागणी काँग्रेस ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत , शिवसेना शिंदें सेनेचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंके, शिवसेना ठाकरे सेनेचे प्रवीण केसकर, काँग्रेसचे सिद्धार्थ बनसोडे, अजहर पठाण, मुहीब शेख आदीनी जिल्हाधिकार्‍यांकडे वेगवेगळ्या निवेदनाद्वारे केली होती. त्याचे वृत्त उस्मानाबाद लाइव्हने दिले होते. 

मकरंद राजेनिंबाळकर यांच्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकालातील कारभाराची चौकशी करा


निवेदनात म्हटले होते की, मकरंद राजेनिंबाळकर हे 2016 ते डिसेंबर 2021 या कालावधीत नगराध्यक्षपदी होते. तसेच यापूर्वी सन 2012 ते 205 या कालावधीत देखील त्यांनी नगराध्यक्ष पदाचा कारभार पाहिला आहे. सदरील कालावधीत नगर पालिकेत प्रचंड गैरव्यवहार व अनियमितता झालेली आहे. सन 2018-19 मध्ये बायोमायनिंगची निविदा मॅनेज करुन चुकीच्या पद्धतीने सुरुवातीस दीड कोटीचे देयक काम न करता उचलले. मोठी रक्कम उचलल्यानंतरही कचरा डेपोवरील ढिगारे अद्याप तसेच आहेत.  

मकरंद राजेनिंबाळकर यांनी नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात दलित वस्ती, जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) व इतर योजनांच्या निधीतून मर्जीतील गुत्तेदारांमार्फत कामे करुन मोठ्या प्रमाणात रक्कम हडप केली. म्हणून प्रत्यक्ष सभागूृहात झालेले ठराव परस्पर बदलून स्वतःचा आर्थिक फायदा करुन घेतला.नगराध्यक्षपदाच्या कार्यकालात त्यांनी  दमदाटी करुन चुकीचे प्रशासकीय कामकाज करुन घेतले. जुलै 2021 च्या एकाच सर्वसाधारण सभेत चारशे पेक्षा जास्त कामे मंजूर करुन घेतल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला होता. 

या निवेदनाची जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दखल घेऊन  उस्मानाबाद नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्यासाठी उमरगा नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती गठीत केली आहे.त्यात उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी गोविंद बोदर , भूम नगर परिषदेचे नगर अभियंता गणेश जगदाळे, लोहारा नगर पंचायतचे जगदीश सोंडगे यांचा समावेश आहे, ही चार सदस्यीय समिती राजेनिंबाळकर यांच्या काळात झालेल्या अनियमित आणि भ्रष्ट कारभाराचे स्पेशल ऑडिट करून जिल्हाधिकाऱ्याकडे आपला अहवाल सादर करणार आहे.त्यामुळे माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांचे धाबे दणाणले आहेत. 

काय आहेत आरोप ? 

s

d

d

From around the web