श्री तुळजाभवानी देवीच्या नावाने ऑनलाईन बाजार 

भाविकांची फसवणूक करणाऱ्या पाच बोगस वेबसाइटवर अखेर गुन्हा दाखल 
 
s
उस्मानाबाद लाइव्हचा दणका 

उस्मानाबाद - महाराष्ट्राची कुलस्वामीनी  श्री तुळजाभवानी देवीच्या नावाने ऑनलाईन बाजार मांडणाऱ्या https://www.tuljabhavani.in/ यासह पाच बोगस वेबसाइटवर अखेर तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. उस्मानाबाद लाइव्हने सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांच्या माध्यमातून या बोगस वेबसाइटची पोलखोल केली होती. 

महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी  मंदिर संस्थानच्या नावे बोगस वेबसाईट काढून भाविकांची फसवणूक करून आर्थिक लूट केली जात होती.  याप्रकरणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे लेखी तक्रार दाखल केल्यानंतर  जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी चौकशीचे आदेश दिले होते. 

यापूर्वीचे वृत्त  श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या नावे बोगस वेबसाईट काढून भाविकांची फसवणूक

जिल्हाधिकाऱ्याकडे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर ची अधिकृत वेबसाइट https://shrituljabhavani.org/ आहे.  मात्र कुणी तरी अज्ञात लोकांनी https://www.tuljabhavani.in/ ही वेबसाइट सुरु करून भाविकांची लूट सुरु केली आहे. या वेबसाइटवर पूजा प्रसाद सेवा ही कॅटेगिरी दिली आहे. त्यावर क्लिक केले की, अभिषेक, अलंकार महापूजा, खण -नारळ ओटी पूजा , जागरण गोंधळ, अन्नदान अश्या पूजा येतात. त्यानंतर पे फॉर प्रसाद सेवा म्हणून ऑप्शन येते, त्यावर क्लिक केले की, फोन नंबर मागितला जातो, आणि नंतर फॉर्म भरून पैसे वसूल केले जातात. मंदिर संस्थानची अधिकृत वेबसाईट समजून लोक ही वेबसाइटच्या माध्यमातून पैसे पाठवत आहेत आणि त्यांची लूट केली जात आहे.  याबाबत उस्मानाबाद लाइव्हवर सर्वप्रथम बातमी प्रकाशित झाली होती. 


अखेर गुन्हा दाखल 

चौकशीमध्ये असे निष्पन्न झाले की, एकूण पाच वेबसाइट भाविकांची फसवणूक करीत आहेत. कोरोना काळात मंदिर बंद असताना तसेच पूजा विधी बंद असतानाही या वेबसाईट चालकांनी भाविकांकडून ऑनलाइन पैसे उकळले. त्यानुसार श्री तुळजाभवानी देवीच्या नावे बोगस वेबसाइट काढून भाविकांची फसवणूक करणाऱ्या  https://www.tuljabhavani.in/ या वेबसाइटसह २ https://tuljabhavanipujari.com / ३  https://www.tuljabhavanimandir.org/ ४. https://shrituljabhavani.com/ ५. https://epuja.co.in/ या पाच वेबसाईटवर भादंवि ४२०, ६६ c , ६६ d नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदिर समितीचे सहाय्यक व्यवस्थापक अनिल चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. 

sd

d


 

From around the web