उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा शंभरी ओलांडली 

 
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा शंभरी ओलांडली

उस्मानाबाद -  उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोके काढले आहे. गेल्या पाच  दिवसांत ८८ नव्या रुग्णांची  भर पडली आहे. कोरोनाने जिल्ह्यात पुन्हा शंभरी ओलांडली असून, कोरोनाचा कहर  पाहून पुन्हा एकदा लॉकडाऊनचे नियम कडक करण्यात आले आहेत. मास्क न वापरणाऱ्यास पाचशे रुपये दंड आकारण्यात येत आहे. 

उस्मानाबादेत मास्क न वापरल्यास पाचशे रुपये दंड


उस्मानाबाद जिल्ह्यात १६ फेबुवारी (मंगळवारी )- १२, बुधवारी -  १७, गुरुवारी - २५, शुक्रवारी - १५ तर आज शनिवारी १९ नव्या रुग्णाची भर पडली. कोरोनाची  आकडेवारी दिवसेंदिवस वाढत चालल्याने पुन्हा एकदा लॉकडाऊनचे नियम कडक करण्यात आले आहेत. उस्मानाबादेत मास्क न वापरणाऱ्यास पाचशे रुपये दंड आकारण्यात येत आहे. 


आजची आकडेवारी 

उस्मानाबाद जिल्ह्यात १७ हजार १३० रुग्ण आढळून आले असून, पैकी १६ हजार ४४५ रुग्ण बरे झाले आहेत.सध्या ११० रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. कोरोनाने आतापर्यंत ५७५ जणांचा बळी घेतला आहे.  

From around the web