बायोडीझलच्या नावाखाली जिल्ह्यात केमिकल युक्त अवैध डीझेलची विक्री

नळदुर्ग, जळकोट परिसरात महसूलच्या पथकाची पाच ठिकाणी धाडी  
 
s

नळदुर्ग  - बायोडीझलच्या नावाखाली केमिकल युक्त अवैध डीझेलची विक्री आणि साठवणूक करणाऱ्या पाच ठिकाणी महसूलच्या एका पथकाने पोलिसांच्या सहाय्याने  विविध ठिकाणी धाडी टाकून लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशानंतर उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार सौदागर तांदळे, सपोनि जगदीश राऊत यांच्यासह एका पथकाने सोलापूर - हैद्राबाद महामार्गावर जयशंकर ढाबा, मौजे आलियाबाद शिवारातील रामदेव हॉटेल, जळकोट शिवारातील गणेश ढाबा , हॉटेल गारवा, हॉटेल महाराजा आदी पाच ठिकाणी धाड टाकून लाखो रुपयाचे  केमिकल युक्त अवैध डीझेल जप्त केले आहे. 

d

उस्मानाबाद जिल्ह्यात बायोडिझेलच्या नावाखाली होत असलेल्या केमिकल युक्त अवैध डीझेलच्या विक्रीवर कार्यवाही न केल्यास बेमुदत संप पुकारण्यात येईल, असा इशारा उस्मानाबाद जिल्हा पेट्रोल पंप असोसिएशनने दिला होता. 

उस्मानाबाद जिल्ह्यातून धुळे बेंगलोर व मुंबई हैद्राबाद हे राष्ट्रीय महामार्ग जात असून या राष्ट्रीय महामार्गावर गेल्या ६ महिन्यांपासून केमिकल युक्त बायोडिझेल च्या नावाखाली मोठ्या प्रमाणात हॉटेल आणि धाब्यांवर विना परवानगी केमिकल युक्त डिझेलची सर्रास विक्री चालू आहे. या केमिकल विक्रीला जिल्हा प्रशासन कार्यालय व पोलिस अधीक्षक कार्यालय आणि इतर शासकीय कार्यालय यांच्याकडून उस्मानाबाद जिल्ह्यात एकही ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही व कोणत्याही कार्यालयात याची नोंद नाही. तसेच राष्ट्रीय महामार्ग व ज्वलनशील पदार्थांचा साठा करण्याबाबत चा कुठलाही परवाना न घेता मोठ्या प्रमाणात याची विक्री चालू आहे. हे केमिकल ज्वलनशील असल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्घटना होऊ शकते. या केमिकल युक्त डिझेलमुळे राज्य शासनाचा महसूल बुडत आहे व पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे.

d


ज्याअर्थी आय ओ सी एल, बी पी सी एल, एच पी सी एल या मानांकन शासकीय कंपन्यांच्या सर्व शासकीय कार्यालयाच्या परवानगी घेऊन व शासकीय मानांकन असलेले डीझेल व पेट्रोलची विक्री अधिकृत पंपावरून होते. उस्मानाबाद जिल्ह्यातील बायोडिझेल च्या नावाखाली होत असलेल्या केमिकल युक्त अवैध डीझेल च्या विक्रीवर कार्यवाही करावी या मागणीसाठीजिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. या निवेदनांतर महसूल अधिकाऱ्यांनी धाडसत्र सुरु केलं आहे. 

d

d

... अन्यथा उस्मानाबाद जिल्ह्यातील पेट्रोल पंप बेमुदत बंद

From around the web