त्या बोगस पत्रकारांकडे अवघ्या दोन दिवसात सापडला साडेपाच लाखाचा गुटखा 

स्थानिक गुन्हे शाखेची दुसऱ्यांदा छापेमारी ; ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह 
 
z

धाराशिव - धाराशिव लाइव्हच्या दणक्यानंतर  अंबेजवळगा येथे सापडलेल्या साडेसात लाखाच्या गुटखा प्रकरणी एका बोगस पत्रकारावर दि. ३१ ऑगस्ट ( गुरुवारी ) रोजी  रात्री गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच बोगस पत्रकाराच्या घरावर  स्थानिक गुन्हे शाखेने २ सप्टेंबर (शनिवारी ) छापा मारून साडेपाच लाखाचा गुटखा जप्त केला आहे. फरार असलेल्या बोगस पत्रकाराच्या घरी अवघ्या दोन दिवसात साडेपाच लाखाचा गुटखा आला कुठून ? असा प्रश्न उपस्थित केला जात असून, ग्रामीण पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. 

धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी अंबेजवळगा येथे बुधवारी ( ३० ऑगस्ट )  दुपारी छापा मारून साडेपाच लाखाचा गुटखा ताब्यात घेतला होता   पण २४ तास उलटून गेले तरी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता . धाराशिव लाइव्हच्या बातमीनंतर पोलिसांची धावपळ सुरु झाली . त्यानंतर गुरुवारी ( ३१   ऑगस्ट ) दुपारी अन्न आणि प्रशासन विभागाला पोलिसांनी पत्र दिले  आणि रात्री आठच्या सुमारास या गुटखा प्रकरणी एका बोगस पत्रकारावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत याच बोगस पत्रकाराच्या घरी साडेपाच लाखाचा गुटखा सापडल्याने ग्रामीण पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. 


पहिली कारवाई 

 दिनांक 30.08.2023 रोजी 15.15 वा. सु. उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी  गायकवाड यांना अंबेजवळगा येथील माळवस्ती मध्ये एक इसम महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ सुगंधीत सुपारी व गोवा गुटख्याच्या पुड्या अवैध्य विक्री करत आहे, अशी गोपनिय बातमी मिळाली त्या बातमीच्या आधारे उस्मानाबाद ग्रामीण पोलीसांच्या पथकाने लागलीच सदर ठिकाणी जाउन छापा कारवाई केली असता. नमुद इसम नामे विशाल हनुमंत पवार, रा.अंबेजवळगा, ता. जि. उस्मानाबाद हा पोलीसांची चाहुल लागताच पळून गेला.

पथकाने सदर घराची पाहणी केली. त्यामध्ये एकुण 7 पोते प्रत्येक पोत्यात 385 पुडे लाल गोवा 1000 किंमत अंदाजे 1,34,750 ₹, 2 पोत्यामध्ये 120 पुडे हिरवा गोवा 1000 किंमत अंदाजे 42,000₹, 24 पोत्यामध्ये 2400 पुडे हिरा पान मसाला किंमत अंदाजे 2,88,000₹, 46 पोत्यामध्ये महा रेयॉल 717 तंबाखुचे 9200 पुडे किंमत अंदाजे 2,76,000₹  एका पोतृयात जाफरानी जर्दा एक्स एल 1 कंपनीचे 208 पुडे किंमत अंदाजे 9,984₹,  असा एकुण 7,50,734 ₹ किंमतीचा सुग्रधीत सुपारी, गुटखा साठवण करुन सदरचा गुटखा विक्री करण्यासाठी घरा मध्ये ठेवलेला मिळून आला. त्याचा सविस्तर पंचनामा करुन माल जप्त करुन ताब्यात घेउन गुटखा विक्री करणारा इसम नामे विशाल हनुमंत पवार, रा.अंबेजवळगा, ता. जि. उस्मानाबाद  याचेविरुध्द दि.31.08.2023 रोजी उस्मानाबाद ग्रामीण पो.ठा. येथे गुरंन 261/2023, भा.दं.वि. सं. कलम- 328, 272, 273, 188 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.  दिनांक 02/09/2023 रोजी गुप्त बातमीदार मार्फत माहिती काढून पोलीस ठाणे उस्मानाबाद (ग्रामीण ) येथे दि.3/09/2023 रोजी गुरनं 265/2023 कलम 328,272,273,188  भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल केला.   

दुसरी कारवाई 

ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या  गुटखा विक्री व साठवणूक प्रकरणी फरार असलेला आरोपी विशाल हनुमंत पवार याच्या घरी आणखी गुटखा असल्याची माहिती मिळताच, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  दिनांक 02/09/2023 रोजी छापा मारून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला गुटखा व तत्सम पदार्थ व गुन्ह्यात वापरलेले वाहन  असा एकूण  5,36.000 रु. चा माल जप्त केला आहे. 

सदर प्रकरणी सविस्तर माहिती अशी की, दिनांक 02.09.2023 रोजी 22.10 स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी . यशवंत जाधव यांना अंबेजवळगा येथील माळवस्ती मध्ये तीन इसम महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ सुगंधीत सुपारी व गोवा गुटख्याच्या पुड्या अवैध्य विक्री करत आहे, अशी गोपनिय बातमी मिळाली त्या बातमीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने लागलीच सदर ठिकाणी जाउन छापा कारवाई केली असता. नमुद इसम नामे 1) आबासाहेब बाबुशा नन्वरे, 2) विशाल हनुमंत पवार, 3) किरण उर्फ कृष्णा जाधव रा.अंबेजवळगा, ता. जि. उस्मानाबाद हे तिघे पोलीसांची चाहुल लागताच पळून गेले. तसेच पथकाने आबासाहेब नन्वरे यांचे शेतात पत्रयाचे शेडमध्ये जावून पाहणी केली. त्यामध्ये एकुण पोते क्र 1 ते 31 मध्ये  हिरा पान मसालाचे पाऊच मिळून आले प्रत्येक पोत्यामध्ये 100 पाऊच, असे एकुण 3100 पाऊच, पोते क्र 32 ते 37 मध्ये पाहणी करता आतमध्ये गुटख्याचे 420 पाऊच सह एक होन्डां शाईन मोटरसायकल असा एकुण 5,36,000 ₹ किंमतीचा सुगंधीत पान मसाला, गुटखा साठवण करुन सदरचा गुटखा विक्री करण्यासाठी पत्रयाचे शेड मध्ये ठेवलेला मिळून आला. त्याचा सविस्तर पंचनामा करुन माल जप्त करुन ताब्यात घेउन गुटखा विक्री करणारे इसम नामे 1) आबासाहेब ननवरे, 2) विशाल हनुमंत पवार, 3) किरण उर्फ कृष्णा जाधव रा. अंबेजवळगा, ता. जि. उस्मानाबाद याचेविरुध्द दि.03.09.2023 रोजी उस्मानाबाद ग्रामीण पो.ठा. येथे गुरंन 265/2023, भा.दं.वि. सं. कलम- 328, 272, 273, 188 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

सदरची कामगीरी ही पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक . नवनित कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी-  यशवंत जाधव, सपोनि  मनोज निलंगेकर, पोलीस हावलदार/हुसेन सय्यद ,अमोल चव्हाण, बबन जाधवर, बलदेव ठाकुर, चालक पोलीस हावलदार/100 मस्के यांच्या पथकाने केली.
 

ग्रामीण पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह 

 पहिल्या कारवाई प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या बिट अंमलदार , मदतनीस आणि वसूलदार  ( D / K / K ) यांनी गुटखा  विक्रेत्याबरोबर तोडपाणी करून, किरकोळ स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते, तसेच बोगस  पत्रकार ऐवजी त्याच्या भावाला आरोपी करण्याचे प्रयत्न सुरु होते. धाराशिव लाइव्हच्या दणक्यानंतर बोगस पत्रकारावर गुन्हा दाखल झाला असला तरी याप्रकरणी  तीन पोलिसांवर आता कोणती कारवाई होणार ? याकडे लक्ष वेधले आहे., असे वृत्त धाराशिव लाइव्हने दि. ३१ ऑगस्ट रोजी दिले होते. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारून साडेपाच लाखाचा माल  जप्त केला आहे. 

धाराशिव लाइव्हच्या दणक्यानंतर गुटखा प्रकरणी बोगस पत्रकारवर गुन्हा दाखल

फरार  असलेल्या आरोपीच्या घरी अवघ्या दोन दिवसांत साडेपाच लाखाचा गुटखा आला कुठून ? असा प्रश्न आहे. ग्रामीण पोलिसांनी पहिल्या कारवाईमध्ये आरोपीबरोबर तोडपाणी करून , सर्व गुटखा  जप्त न करता, अर्धा माल आहे त्या ठिकाणीच ठेवला होता  तसेच छापेमारीवेळी आरोपी घटनास्थळी असताना तसेच दुपारी पोलीस स्टेशनमध्ये आला असताना  त्यास फरार दाखवून मोठी तोडपाणी केल्याची चर्चा आहे. बुधवार दि. ३० ऑगस्ट रोजीचे दिवसभराचे फुटेज तपासून तोडपाणी करणाऱ्या बिट अंमलदार , मदतनीस आणि वसूलदार  ( D / K / K ) तसेच दोषी पोलिसांवर  कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. 


 

From around the web