आळणीच्या कला केंद्रातील डीजे अखेर बंद

उस्मानाबाद - उस्मानाबाद लाइव्हच्या दणक्यानंतर आळणीच्या कला केंद्रातील डीजे अखेर बंद झाला आहे. त्यामुळे जवळपास २५ ते ३० कलाकारांना उस्मानाबाद लाइव्हमुळे न्याय मिळाला आहे.
येडशी रोडवरील आळणी फाट्यावर तीन कला केंद्र आहेत. या तिन्ही कला केंद्रावर ढोलकी आणि पेटी वाजवणारे जवळपास २५ ते ३० कलाकार आहे. कोरोना महामारीमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती.अनेक कलाकार बांधकामावर मजूर म्हणून जात होते.
मागील काही दिवसापासून कला केंद्र पुन्हा सुरु झाले खरे, मात्र मालकांनी कलाकारांना वाऱ्यावर सोडून डीजे सुरु केला होता. डीजेच्या तालावर बारबालांचा छम छम सुरु होता. त्यामुळे या सर्व कलाकारांनी डीजे बंद करावा म्हणून निदर्शने केली होती.
आळणीच्या कला केंद्रात डीजेच्या तालावर छम छम सुरु ( VIdeo)
कलाकेंद्रात डीजेची परवानगी नसताना नियमबाह्य आणि बेकायदेशीररित्या डीजे सुरु होता. या संदर्भात उस्मानाबाद लाइव्ह मध्ये वृत्त प्रकाशित होताच, तिन्ही कला केंद्रातील डीजे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कलाकारांनी उस्मानाबाद लाइव्हचे आभार मानले आहेत.