आळणीच्या कला केंद्रात डीजेच्या तालावर छम छम सुरु ( VIdeo)

डीजे बंद करण्यासाठी कलाकारांची निदर्शने 
 
s

उस्मानाबाद -  येडशी रोडवरील आळणी फाट्यावरील पिंजरा कला केंद्रात डीजेच्या तालावर बारबालांचा  छम छम सुरु आहे. कला केंद्रात डीजे लावण्यास प्रतिबंध असताना विनापरवाना आणि बेकायशीर डीजे लावून बारबालांचा  डिस्को डान्स सुरु आहे. गंभीर बाब म्हणजे रात्री उशिरापर्यंत हा धिंगाणा सुरु असताना, पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत. 

आळणी फाट्यावर तीन कला केंद्र असून, या तिन्ही कला केंद्रात ढोलकी आणि पेटी वाजवणारे जवळपास २५ ते ३० कलाकार आहेत. त्यांचे काम बंद करून डीजे लावण्यात आल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे डीजे बंद करा म्हणून या कलाकारांनी निदर्शने केली आहेत. 

कोरोना काळात कला केंद्र बंद पडल्याने या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली. आता कला केंद्र सुरु झाले तरी त्यांना कामावर न घेता डीजे लावून कला केंद्र मालक लोकांना लुटत आहेत. 

या तिन्ही कला केंद्रात रात्रीच्या वेळी मोठी गर्दी असते. डीजेच्या तालावर बारबाला डान्स करीत असल्याने त्यांच्यावर पैश्याची देखील उधळण होत आहे. पोलिसाना दरमहा  ठराविक हप्ता मिळत असल्याने या कला केंद्रावर कोणतेही कारवाई होत नाही. त्यामुळे राज्याच्या गृह विभागाने याची गंभीर दाखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. 

Video 

From around the web