धक्कादायक : नळदुर्ग पोलिसांची टू व्हीलर गाडी घेऊनच झिरो पोलिसांनी 'ती' गुटख्याची गाडी अडवली ... 

 
s

नळदुर्ग - नळदुर्ग पोलीस स्टेशनमधील एका वसूलदार पोलिसाची  टू व्हीलर गाडी घेऊनच झिरो पोलिसांनी 'ती' गुटख्याची गाडी अडवल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. नळदुर्ग बसस्थानक आणि नळदुर्ग टी  पॉईंटजवळील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतल्यास ती गाडी कोणत्या पोलिसाची होती, हे उघड होणार आहे. दरोडा प्रकरणी त्या पोलिसांवर आणि गुटख्याची गाडी सोडून दिल्याबद्दल सपोनि सिद्धेश्वर गोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. 

 निगडी ( पुणे ) येथील निखिल ट्रान्सपोर्टचा आयशर टेम्पो ( क्रमांक एमएच २५, एजे १४८६ ) हा हैद्राबाद येथून  गुटखा भरून नळदुर्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीत येताच, दि. १९ जुलै रोजी रात्री  गोलाई चौक, चिवरी पाटीजवळ काही  झिरो पोलिसांनी  तो जबरदस्तीने आडवून तो सपोनि  सिद्धेश्वर गोरे यांच्या ताब्यात दिला होता.  मात्र गोरे यांनी टेम्पोतील माल अज्ञात ठिकाणी रिकामा करून गुटख्याचा गुन्हा दाखल करण्याऐवजी गाडी अडवणाऱ्या झिरो पोलिसांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता. 

सपोनि गोरेनी सोडलेल्या 'त्या' टेम्पोमध्ये गुटखाच होता, हे घ्या आणखी एक पुरावा ....

गुटख्याचा आयशर टेम्पो ( क्रमांक एमएच २५, एजे १४८६ ) पकडल्यानंतर  गुटखा तस्कर नकुल पंडित ( मूळ आडनाव साळवी ) हा चांगलाच चिडला आणि हप्ता देऊन देखील गाड्या पकडत असाल तर काय उपयोग म्हणून सुनावल्यानंतर गोरेनी  त्या टेम्पोमधील गुटखा चालकांमार्फत अज्ञात ठिकाणी उतरवून, रिकामा टेम्पो दाखवून दि. २१ जुलै रोजी गुटख्याची गाडी पकडणाऱ्या गणेश नागनाथ वचने ( वय १९ ) , सय्यद अमीर अझहर जहागीरदार ( वय २२), संदीप संजय राठोड , सुशील संजय  राठोड, मिटू उर्फ इंद्रजितसिंह ठाकूर सर्व रा. नळदुर्ग यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल केला. टेम्पो चालक सहदेव माडजे  रा. कोंडजी ता. लोहारा यास मारहाण करून १२ लाखाचा आयशर टेम्पो आणि खिशातील ३५ हजार जबरदस्तीने पळवून नेल्याचा गुन्हा या झिरो पोलिसांवर दाखल  करण्यात आला आहे. 


आपण ही गाडी पोलिसांच्या सांगण्यावरूनच अडवली होती पण पोलिसांनी आपणावर खोटा गुन्हा दाखल  केल्याचे या झिरो पोलिसांचे म्हणणे आहे. आयशर टेम्पो ( क्रमांक एमएच २५, एजे १४८६ )  अडवताना एका  वसूलदार पोलिसांची  टू व्हीलर गाडी वापरण्यात आली होती, अशी धक्कादायक माहिती हाती आली आहे. नळदुर्ग बसस्थानक आणि नळदुर्ग टी  पॉईंटजवळील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतल्यास ती गाडी कोणत्या पोलिसाची होती, हे उघड होणार आहे. या वसूलदार पोलिसांचे नाव झिरो पोलिसांनी व्हिडीओच्या माध्यमातून जाहीर केले आहे. 

गुटखा तस्करीत नळदुर्ग पोलिसांचे हात गुंतले , हा घ्या पुरावा .... ( Video )

हा वसूलदार पोलीस जुन्या साहेबाचा अत्यंत विश्वासू होता. तोच गुटखा तस्करकडून वसुली करीत होता. सध्या त्याचे दप्तर सील करून खातेनिहाय  चौकशी सुरु करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे जुन्या साहेबाचे धाबे दणाणले आहेत. दरोडा प्रकरणी त्या वसूलदार पोलिसांवर आणि गुटख्याची गाडी सोडून दिल्याबद्दल सपोनि सिद्धेश्वर गोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. 

चोरावर मोर ! दाद ना फिर्याद ! ! गुटखा गाडी लुटली तरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नाही ...

From around the web