चोरावर मोर ! दाद ना फिर्याद ! ! गुटखा गाडी लुटली  तरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नाही ... 

 
s

नळदुर्ग -   आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातून धाराशिव जिल्ह्यात येणारा गुटखा उमरगा, नळदुर्ग मार्गे येतो.तिकडून हा गुटखा  नकुल पंडित ( मूळ आडनाव साळवी ) आणि राम डोंबे ( बार्शी ) पाठवतो आणि या गाड्या पकडण्याचे काम झिरो पोलीस  करीत होते. अनेक वेळा हे झिरो पोलीस ट्र्क  टेम्पो , छोटा हत्ती आदी वाहनातून येणारा गुटखा पोलिसांना न सांगता परस्पर पकडून परस्पर विकत होते. गुटखा लुटल्यानंतर वाहनचालक पोलीस स्टेशनमध्ये जातच  नव्हते. जाणार तर कोणत्या तोंडाने ? त्यामुळे चोरावर मोर होण्याचे प्रकार मागील दोन वर्षात अनेकवेळा घडले आहेत. 

आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातून  गोवा गुटखा, बादशा , आरके गुटखा, सागर, विमल, हिरा, हिना, बाबा, आरएमडी असा दहा कंपनीचा गुटखा सप्लाय केला जातो. मुख्य  गुटखा तस्कर नकुल पंडित ( मूळ आडनाव साळवी ) आणि राम डोंबे ( बार्शी )  असून, त्यांचा लाखो  रुपयाचा हप्ता पोलिसाना सुरु आहे. वसुली करणारे पोलीस दहा कंपन्यांकडून वसुली करीत होते,  वरिष्ठ साहेबाना मात्र दोनच कंपनीचा हप्ता पोहच करीत होते. त्यामुळे साहेबापेक्षा वसुली करणारे कोट्याधीश झाले आहेत. 

गुटख्याच्या गाड्या पकडणाऱ्या नळदुर्ग, उमरगा, तुळजापूर लातुर, सोलापूर आदी पाच  ठिकाणी जवळपास दहा  टोळ्या कार्यरत आहेत. त्यांचे नाव झिरो पोलीस पडले आहे. त्याच्यात देखील मुख्य म्होरक्याला पोलीस निरीक्षक, त्यानंतर उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल असे संबोधले जात होते. एका टोळीत किमान पाच ते सात जण होते. आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातून  गुटख्याची गाडी निघाल्याची पक्की खबर या टोळीला लागत होती. गुगल मॅपच्या माध्यमातून गुटख्याची गाडी कुठवर आली हे ट्रॅक करीत होते. गुटख्याच्या गाड्या या शकतो रात्रीच्या सुमारास उमरगा हद्दीत प्रवेश करीत होत्या. उमरगा येथून गाडी निघाली की हे  झिरो पोलीस सतर्क होते आणि नळदुर्ग - तुळजापूर रोडवरील चिवरी पाटी किंवा तुळजापूरजवळील वळण रस्ता ( लातूरकडे जाणारा रस्ता ) येथे आडवून त्यातील गुटखा लुटत होते. 

d

अनेक वेळा हे झिरो पोलीस ट्र्क  टेम्पो , छोटा हत्ती आदी वाहनातून येणारा गुटखा पोलिसाना न सांगता परस्पर पकडून परस्पर विकत होते. गुटखा लुटल्यानंतर वाहनचालक पोलीस स्टेशनमध्ये जात नव्हते. जाणार तर कोणत्या तोंडाने ? त्यामुळे चोरावर मोर होण्याचे प्रकार मागील दोन वर्षात अनेकवेळा घडले आहेत.दाद ना फिर्याद ! यामुळे गुटखा पकडणाऱ्या टोळ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या टोळीमध्ये हद्द देखील वाटून घेण्यात आली होती, हे विशेष... 

तोडपाणी झाली तर गाडी सोडणे, तोडपाणी नाही झाली तर पोलिसाना पाचारण करून तोडपाणी करणे आणि नाहीच झाली तर शेवटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणे सुरु होते. एका गाडीत किमान ३० लाखाचा गुटखा असतो. किमान तोडपाणी ५ ते १० लाखाची होत होती. त्यात पोलीस ७० टक्के आणि झिरो पोलीस ३० टक्के असा होता. गुन्हा दाखल करताना देखील अर्धा माल  खाली करून, अर्धा माल दाखवला  जात होता. त्यामुळे पोलीस आणि झिरो पोलीस मालामाल होत होते. 

हे सर्व उमरगा आणि नळदुर्ग पोलिसांच्या आशीर्वादामुळे सुरु होते. सपोनि सिद्धेश्वर गोरे यांचे  या टोळी बरोबर अर्थपूर्ण संबंध होते. पण १९ जुलै रोजीचे प्रकरण त्यांच्या अंगलट आले आणि गोरेंचा काळा  कारभार चव्हाट्यावर आला. 

येरमाळा पोलीस स्टेशनच्या पोलिसांची साहेबांपेक्षा जादा कमाई 

येरमाळा पोलीस स्टेशनमध्ये सध्या कार्यरत असलेला पोलीस कॉन्स्टेबल क. बो . हा पूर्वी महामार्ग पोलीस म्हणून कार्यरत होता. त्याचे गुटखा तस्करबरोबर थेट संबंध आहेत.त्याच्याकडे  गुटखा गाडीची पक्की खबर असते. बीड जिल्ह्यात गुटखा पाठवण्याचे काम हा क. बो  करतो. १४ ऑगस्ट रोजी गुटख्याची एक गाडी तुळजापूर शहराजवळील हॉटेल मातोश्रीसमोर  ( तुळजापूर - धाराशिव रोड ) अडवून,या पोलिसाने ५० हजाराची वसुली केल्याचा पुरावा धाराशिव लाइव्हच्या हाती लागला आहे. 

हा क. बो . ने गुटख्याच्या लाचेतून  पुण्यात चार फ्लॅट घेतल्याची माहिती मिळाली आहे. साहेबांपेक्षा जादा कमाई करणाऱ्या या पोलिसांची पोलीस मुख्यालयात तात्काळ उचलबांगडी करून चौकशीअंती निलंबित करावे, अशी मागणी होत आहे.  

From around the web