महापुरात वाहून गेलेल्या मयत बालाजी कांबळे याच्या कुटुंबास मनसेकडून आर्थिक मदत
उस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यात २६ आणि २७ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे तेरणा नदीला महापूर येवून इर्ला गावात पाणी शिरले होते. याच महापुराच्या पाण्यात 32 वर्षीय तरुण बालाजी कांबळे हा वाहत गेला असून, सात दिवस झाले तरी त्याचा मृतदेह सापडलेला नाही.
इर्ला गावातील तरुणाचा मृत्यू : कुटुंबाला मदतीची गरज Video
या गावाला आमदार, खासदार आणि पालकमंत्री भेट देण्यास गेले पण कुणीही मयत बालाजी कांबळे यांच्या कुटुंबास भेटले नाही तसेच शासकीय अधिकारी सुद्धा फिरकलेला नाही. परवा वंचीत बहुजन आघाडीचे कार्यकर्ते भेटले होते.
उस्मानाबाद लाइव्हने कांबळे याच्या कुटुंबास मदतीचे आवाहन केल्यानंतर आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी मयत बालाजी कांबळे याच्या आई-वडिलांची भेट घेऊन दहा हजार आर्थिक मदत केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या वतीने त्या कुटुंबियांना उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत करण्यात आली.
यावेळी मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन, प्रदेश सरचिटणीस संतोष नागरगोजे, उपाध्यक्ष अशोक तावरे, जिल्हा संघटक अमरराजे कदम, जिल्हा सचिव दादा कांबळे, तालुका अध्यक्ष पाशा शेख, सलीम औटी, बाबासाहेब वाघमारे सर ,दत्ता बोदंर,भागवत शिंदे, रजनीकांत ढवारे,विष्णू पाटील आदी उपस्थित होते..
मयत बालाजी कांबळे हा घरातील कर्ता पुरुष होता. त्यास वृद्ध आई - वडील असून त्यांना दोन लहान मुले आहेत,लोकांनी आपल्या परीने आर्थिक मदत करावी, असे आवाहन उस्मानाबाद लाइव्हच्या वतीने करण्यात आले आहे.