पुराच्या पाण्यात वाहत गेलेल्या तरुणाचा चौथ्या दिवशी मृतदेह सापडला नाही ... 

इर्ला गावातील तरुणाचा मृत्यू : कुटुंबाला मदतीची गरज Video 
 
S

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात रविवार आणि सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे तेर,दाऊतपूर, इर्ला, रामवाडी आदी गावांना मोठा फटका बसला. तसेच इर्ला येथील एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह चौथ्या दिवशी सापडला नाही . मयताच्या कुटुंबाची वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अॅड.  जीनत प्रधान यांनी आज भेट घेऊन त्यांची व्यथा जाणून घेतली.  


 इर्ला गावातील 32 वर्षीय तरुण बालाजी कांबळे पुरात वाहून गेला  होता. भंडारवाडी येथील पुलावरील  पाण्यात तोल गेल्याने तो वाहत गेला होता. त्याचा शोध जिल्हा आपत्ती व्यवस्थापनची टीम घेत आहे. .  त्याचा मृतदेह चौथ्या दिवशी सापडला नाही . बेपत्ता  बालाजी कांबळे याच्या कुटुंबाची बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अॅड.  जीनत प्रधान भेट घेऊन चर्चा केली असता त्याला दोन मुले ,आई व एक भाऊ आहे .घरातील तो कर्ता पुरुष होता .त्याच्या कुटुंबाला मदतीची गरज आहे. 

ED


वंचित बहुजन आघाडीच्या टीमने  तेर , वानेवाडी , कोळेवाडी , रामवाडी, दाऊतपुर . इर्ला या गावाचा दौरा करून पुरामुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी केली. तसेच पूरग्रस्तांना समक्ष भेटून झालेल्या नुकसानीबाबत माहिती  घेतली. 

इर्ला  गावात मोठ्या  प्रमाणात पाणी शिरल्याने अनेक  कुटुंबाच्या घरांमध्ये दोन दिवस पाणी असल्याचे सांगितले . त्यामुळे गावातील ग्रामपंचायतीने त्यांची राहण्याची व खाण्याची सोय शाळेमध्ये केले असल्याचेही सांगण्यात आले . परंतु पुन्हा जर जास्त पाणी आले तर सदर 70 घरं पाण्यात वाहून जाऊ शकतात अशी भीती व्यक्त केली . त्यामुळे अश्या  कुटुंबाचे पुनर्वसन करण्याची  मागणी करण्यात आली. 


वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अॅड.  जीनत प्रधान यांच्या नेतृत्वाखाली वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या  टिममध्ये जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव ,महिला आघाडीच्या उपाध्यक्षा ज्योतीताई लोखंडे , संघटक सुजाता बनसोडे, कोषाध्यक्ष रुक्मिणी बनसोडे , विद्याताई वाघमारे अस्मिताताई पारवे तसेच विद्यानंद वाघमारे ,सोमनाथ नागटिळक, विजय बनसोडे यांचा समावेश होता . 

या पथकाने  तेर , वानेवाडी , कोळेवाडी , रामवाडी, दाऊतपुर . इर्ला या पुरामुळे नुकसान झालेल्या भागांचा दौरा करून  पूरग्रस्तांना समक्ष भेटून  झालेल्या नुकसानीबाबत माहिती  घेतली . 

From around the web