विरोधी पक्षनेते फडणवीस, प्रवीण दरेकर उद्या उस्मानाबाद जिल्ह्यात

पुरात वाहून गेलेल्या इर्ला येथील बालाजी कांबळे याच्या कुटुंबाला भेटणार का ? 
 
d
इर्ला गावातील ७० घरांचे पुर्नवसन करण्याची गरज 

उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सोमवारी (दि.४) जिल्ह्यात येत आहेत. या भेटीत पुराच्या पाण्यात वाहत गेलेल्या इर्ला येथील बालाजी कांबळे याच्या कुटुंबाला फडणवीस, दरेकर भेटणार का ? याकडे लसख वेधले आहे. 


जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टी होऊन शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझड झाली तर साेयाबीनसह उसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेतकऱ्यांची समस्या जाणून घेण्यासाठी फडणवीस व दरेकर सोमवारी जिल्ह्यात येत आहेत.दोघेही लातूरवरून येत असून, उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूर येथे दुपारी एक वाजता नुकसानग्रस्त भागाला भेट देतील. त्यानंतर दोन वाजता तेर येथे पाहणी करतील. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. कळंब तालुक्यातील आवाड शिरपुरा येथे शेतीची पाहणी करतील. 


उस्मानाबाद  तालुक्यात २६ आणि २७ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे तेरणा नदीला महापूर येवून इर्ला गावात पाणी शिरले होते. याच महापुराच्या पाण्यात 32 वर्षीय तरुण बालाजी कांबळे हा वाहत गेला असून, आठ  दिवस झाले  तरी त्याचा मृतदेह सापडलेला नाही. 

आमदार, खासदार, पालकमंत्री इर्ला गावात गेले पण साधी विचारपूस नाही....

या गावाला आमदार, खासदार आणि पालकमंत्री भेट देण्यास गेले पण कुणीही मयत बालाजी कांबळे यांच्या कुटुंबास भेटले नाही तसेच शासकीय अधिकारी सुद्धा फिरकलेला नाही, किमान विरोधी पक्षाचे नेते तरी या कुटुंबाला भेटून शासकीय स्तरावर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार का ? याकडे लक्ष वेधले आहे. 


इर्ला  गावातील ७० घरांचे पुर्नवसन करण्याची गरज 

इर्ला गावापासून तेरणा नदी वाहते. नदी पात्राच्या कडेला एकूण ७० घरे आहेत. २६ आणि २७ सप्टेंबर रोजी नदीला पूर आल्यानंतर दोन दिवस सर्व घरातील लोक  शाळेत तसेच अन्य ठिकाणी आश्रयाला गेले होते. दोन दिवस सर्वांच्या घरात पाणी होते. भविष्यात पुन्हा पूर आला तर ही ७० घरे वाहून जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी या ७० घरांचे पुर्नवसन आवश्यक आहे. 

असा असेल दौरा 

दु. १२.२० वा - करजखेडा ता. धाराशिव (उस्मानाबाद) येथे आगमन
दु. १.१५ वा. - दाऊतपूर / इर्ला (बेंबळी - चिखली मार्गे) ता.धाराशिव (उस्मानाबाद) येथे आगमन व नुकसानीची पाहणी
दु. २.१५ वा. - तेर ता. धाराशिव (उस्मानाबाद) येथे आगमन व नुकसानीची पाहणी
४.२० वा. - आवाडशिरपुरा ता. कळंब येथे आगमन व नुकसानीची पाहणी
५.१० वा. - वाकडी ई /सौन्दणा (आंबा)ता. कळंब येथे आगमन व नुकसानीची पाहणी 

From around the web