उस्मानाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयावरून 'कलगी तुरा' रंगला !

भाजपचे नितीन काळे यांना शिवसेनेचे सतीश सोमाणी यांचे  प्रत्युत्तर
 
उस्मानाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयावरून 'कलगी तुरा' रंगला !

उस्मानाबाद - उस्मानाबादला वैद्यकीय महाविद्यालय तर भाजप सत्तेत असताना होणार असल्याचे गिरीश महाजन यांनी सभागृहात सांगितले होते. घोषणा करुन सुध्दा ते होऊ शकले नाही,  हे डोळ्यावर पट्टी बांधलेल्या तुमच्यासारखा पत्रकबाज  कार्यकर्त्याला दिसणार नाही , असा पलटवार शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमाणी यांनी यांनी नितीन काळे यांचे नाव न घेता लगावला.

सत्ताधारी आमदार, खासदार पत्रकापुरते , वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावाची प्रगती शून्य ! असे पत्रक भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे काढले होते, त्याला सोमाणी यांनी  प्रत्युत्तर दिले आहे. 

सत्ताधारी आमदार, खासदार पत्रकापुरते ...

पत्रकबाजी कोण करतय हे अवघ्या जिल्ह्याला माहिती आहे, आता फक्त अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षाच्या निवडणुकीबाबत तुमच्यासारख्या  नेत्यांनी पत्रक काढलेले नाही हे नशीब म्हणाव लागेल. वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाबतीत खासदार व आमदार प्रामाणिक प्रयत्न करीतच आहेत, पण ते होणार म्हणून  तुमच्या पोटात गोळा आला आहे. त्याचा हा पुरावा तुमच्या पत्रकावरुन दिसुन येत आहे.

 दुसऱ्या बाजुला हे 'वैद्यकीय महाविद्यालय शासनाच्या ताब्यात कशासाठी त्यात आमचा हातखंडा आहे, ते आम्ही चालवतो म्हणुन खाजगी भागीदारीचा प्रस्ताव दाखल करणारे कोण होते? शेतकऱ्यांचे हक्काचे ट्रस्ट त्यांच्या नावाने हे वैद्यकीय महाविद्यालय सूरु करण्याचा डाव कोणाचा होता, तो हाणून   पडल्याने अस्वस्था झालेल्याकडून दुसरी अपेक्षा काय करायची असाही प्रतिटोला सोमाणी यांनी यानी लगावला आहे. 

याविषयी उत्तर देण्याची धमक दाखवा व त्यावरही एक पत्रक काढण्याचे प्रतिआव्हान सोमाणी  यानी दिले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शासनाच्याच अधिपत्याखाली राहणार असल्याने पोटशुळ सुटलेल्यानी आम्हाला प्रश्न विचारु नये. चाळीस वर्षाची पाप धुवुन काढायला थोडा वेळ लागणारच हे आम्ही मान्यच करतो. जनतेसाठी हे दोन्ही लोकप्रतिनिधी प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे पाहुन तुमचा खोटारडेपणा उघड व्हायला वेळ लागणारच नाही. खोटारेडापणाची सवय कोणाला आहे हे पुन्हा -पुन्हा तुम्हाला सांगायची आता आवश्यकता राहिलेली नाही.

 शासकीय महाविद्यालयाच्या यादीत उस्मानाबादचे नाव आल्याचे पाहुन तरी तुम्हाला समाधान वाटायला हवे होते.वर्षभर शुन्य प्रगती असल्याची बाब समोर मांडल्यानंतर त्यात काहीच घडले नसल्याचा दावा करताना किमान मागील पाच वर्षाच्या काळातील तुमच्या नेत्यांच्या घोषणेचा तरी विसर पडायला नको होतो. एक वर्षाचा हिशोब मागणाऱ्यांनी चाळीस वर्षाचा हिशोब कोण देणार ? असा सवालही सोमाणी  यानी उपस्थित केला. विरोधाला विरोध यापेक्षा अधिकची अपेक्षाही तुमच्याकडुन नाही, त्यातच तुमचे लोकाप्रती व जिल्ह्याच्या विकासाप्रती काय भावना आहेत, हे दिसुन येते. वैद्यकीय महाविद्यालयासाठी आर्थिक तरतुदीची आवश्यकता आहे, ही तरतुद करण्यासाठी खासदार व आमदारानी अगोदरही प्रयत्न केलेत ते पुर्ण झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत असा विश्वास सोमणी  यांनी व्यक्त केला.

From around the web