कळंबमध्ये डॉ. लोंढे यांना मारहाण करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल 

 
d

 कळंब: शहरातील बालरोगतज्ज्ञ डॉ.अभिजित लोंढे यांना मारहाण यांना माजी खासदार कल्पना नरहिरे यांच्या पुतण्याने शनिवारी किरकोळ कारणावरून मारहाण केली होती. अखेर पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

डॉ. अभिजीत लोंढे हे दि. 12 जून रोजी 11.30 वा. सु. नर्सिंग होम, कळंब येथे लसीकरणाचे काम करत होते. यावेळी ढोर गल्ली, कळंब येथील बालाजी भिवाजी नरहिरे यांनी लसीकरण केंद्राच्या बाहेर येउन मोठमोठ्याने आरडा- ओरड करुन शिवीगाळ करण्यास सुरवात केली.

माजी खासदार कल्पना नरहिरे यांच्या पुतण्याकडून मारहाण झाल्याने खळबळ

 यावर लोंढे यांनी नरहिरे यांस हटकले असता नरहिरे यांनी लोंढे यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करुन लोंढे करत असलेल्या शासकीय कामात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला. यावरुन अभिजीत लोंढे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नरहिरे यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 353, 323, 504 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 तुळजापुरातील एक वर्षांपासून पाहिजे असलेले तीन आरोपी ताब्यात

उस्मानाबाद -  पो.ठा. तुळजापूर गु.र.क्र. 371 / 2020 या गुन्ह्यातील आरोपी- 1)महेश विष्णू माळी, वय 32 वर्षे, 2)नितीन चांगदेव माळी, वय 27 वर्षे, 3)गणेश शिवाजी माळी, वय 23 वर्षे, तीघे रा. काटगाव, ता. तुळजापूर हे मागील 1 वर्षापासुन पोलीसांना तपासकामी हवे होते. स्था.गु.शा. च्या सपोनि- श्री. मनोज निलंगेकर, पोहेकॉ- साळुंके, पोकॉ- पांडुरंग सावंत, बलदेव ठाकुर यांच्या पथकास ते तिघे  गावी आल्याची गोपनीय माहिती मिळताच त्यांना आज दि. 13 जून रोजी काटगाव शिवारातून ताब्यात घेउन पुढील कार्यवाहीस्तव तुळजापूर पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.

कोविड मनाई आदेश झुगारुन दुकान चालू ठेवणाऱ्यावर गुन्हा दाखल

उमरगा: संतोष अशोकराव शहरवाले, रा. साठे चौक, उमरगा यांनी दि. 12 जून रोजी 09.30 वा. सु. साठे चौकातील आपले ‘संतोष फुटवेअर’ हे दुकान व्यवसायास चालू ठेउन अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी जारी केलेल्या मनाई आदेशांचे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269 सह महाराष्ट्र कोविड- 19 विनीयमन कलम- 11 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web