जालना येथून  रेमडेसिवीरच्या ९६०  वायल्स अखेर उस्मानाबादला पोहचल्या 

 
जालना येथून रेमडेसिवीरच्या ९६० वायल्स अखेर उस्मानाबादला पोहचल्या

उस्मानाबाद -जालना येथून  रेमडेसिवीरच्या ९६०  वायल्स  अखेर उस्मानाबादला पोहचल्या असून त्या वायल्स जिल्ह्यातील शासकीय  २१ खासगी हॉस्पिटलला देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 

अनेक दिवसांपासून रेमडेसिवीरचा तुटवडा महाराष्ट्रभर भासत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात या औषधाची गरज असताना प्रत्यक्षात उपलब्धता अत्यंत कमी होती. शासकीय आरोग्य यंत्रणेकडे असलेला साठा संपला होता व मागणी करूनही रेमडेसिवीर उपलब्ध होत नव्हते.  आरोग्यमंत्री ना. राजेशजी टोपे यांनी जालन्यात १०००० रेमडेसिवीर च्या व्हायल्स उपलब्ध करून दिल्याचे ट्विटर द्वारे जाहीर केले होते.  ना. राजेशजी व ना. डॉ. राजेंद्रजी शिंगणे यांच्याकडे उस्मानाबादला रेमडेसिवीर देण्याबाबत आपण मागणी केल्याचे आ. राणा पाटील यांनी सांगितले होते. 

 जिल्हाधिकारी, जालना यांच्याबरोबर चर्चा करून ५०० व्हायल्स उस्मानाबादसाठी तातडीने उपलब्ध करण्याचे मान्य झाले व जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांना या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या आहेत. हे ५०० व्हायल्स आज उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात पोहोचतील व जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणेला रुग्णांच्या आवश्यकतेनुसार उपलब्ध करण्यात येतील, असे पत्रक आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी १५ एप्रिल रोजी प्रसिद्धीसाठी काढले होते. 

मात्र तीन दिवस झाले तरी उस्मानाबादला रेमडेसिवीर वायल्स न आल्याने उस्मानाबाद लाइव्हने या संदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. 

आ. राणा जगजितसिंह पाटील यांचा दावा फोल

अखेर सात दिवसांनी ९६० वायल्स जालना येथून उस्मानाबादला आल्या असून, त्यामुळे कोरोनाने अतिगंभीर असलेल्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे. 

From around the web