धाराशिव लाइव्हचा दणका : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांची मुरुडला उचलबांगडी

 
g

धाराशिव - धाराशिव लाइव्हच्या दणक्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांची मुरुड ( जि. लातूर ) येथे उचलबांगडी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे डॉ. गलांडे यांची उचलबांगडी करताना पदावनती  करण्यात आली आहे. 

प्रतिनियुक्तीचे कोणतेही अधिकार नसताना, अधिकाराचा गैरवापर करून , जिल्हा शल्य जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी ८ ते १०  वैद्यकीय  अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्ती दिली होती. एका प्रतिनियुक्तीचा दर ४० ते ५० हजार होता. त्याची बातमी धाराशिव लाइव्हने दिल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री  डॉ. तानाजी सावंत यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांना चांगलेच धारेवर धरून  कानउघडणी केली, तसेच आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ अर्चना भोसले  यांना फोन करून कारवाई  करण्याचे  निर्देश दिले होते. 

अखेर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांची मुरुड ( जि. लातूर ) येथील   ग्रामीण रुग्णालयात वैद्यकाय अधीक्षक म्हणून उचलबांगडी करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक असलेल्या गलांडे यांची  पदावनती करण्यात आली आहे. 

as

४० ते ५० हजार रुपये द्या आणि प्रतिनियुक्ती घ्या

धाराशिव लाइव्हचा दणका : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गलांडे यांच्यावर कारवाईचे निर्देश

From around the web