४० ते ५० हजार रुपये द्या आणि प्रतिनियुक्ती घ्या 

धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या  जिल्हा शल्य चिकित्सकांचा भ्रष्ट कारभार 
 
s

धाराशिव - धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या  जिल्हा शल्य चिकित्सकांचा भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. प्रतिनियुक्तीचे कोणतेही अधिकार नसताना, अधिकाराचा गैरवापर करून , जिल्हा शल्य चिकित्सकांनी ८ ते १०  वैद्यकीय  अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्ती दिली आहे. एका प्रतिनियुक्तीचा दर ४० ते ५० हजार ठरला असून, अनेकजण सोयीच्या ठिकाणी जाण्यासाठी हातात नोटांचे बंडल  घेऊन तयार आहेत. 

धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालय सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अधिकारावर गदा आली  आहे. असे असतानाही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ,. राजाभाऊ गलांडे हे मनमानी पद्धतीने कारभार करीत आहेत.  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठता डॉ. शिल्पा डोमकुंडवर यांच्यासोबर त्यांचे वारंवार खटके उडत आहेत. २ ऑगस्ट रोजी झालेल्या एका बैठकीत दोघांत  चांगलीच वादावादी झाल्याची चर्चा आहे. 

दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी, प्रतिनियुक्ती न देण्याबाबत आरोग्य उपसंचालक ( लातूर ) यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत  ८ ते १०  वैद्यकीय  अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना  सोयीच्या ठिकाणी प्रतिनियुक्ती दिल्याचे समजते, त्यासाठी ४० ते ५० हजार दर ठेवण्यात आला होता, असे कळते. एका कर्मचाऱ्यामार्फत डॉ. राजाभाऊ गलांडे यांना  या नोटा पुरवल्या जात आहेत. 

डॉ. सूर्यवंशी यांची उमरगा येथून धाराशिव ( उस्मानाबाद ) येथे बदली झालेली असताना, त्यांना पुन्हा उमरगा येथे प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. डॉ. सचिन देशमुख यांची तुळजापूरला बदली असताना पुन्हा धाराशिव येथे प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. डॉ. जगन्नाथ कुलकर्णी यांची उमरगा येथून बेंबळी येथे बदली झालेली असताना, पुन्हा उमरगा येथे प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. डॉ. भोरे यांची नळदुर्गला बदली झाली असताना, भूम येथे प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. अश्या  ८ ते १०  वैद्यकीय  अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्ती देण्यात आली असून, दररोज  प्रतिनियुक्ती घेण्यासाठी   वैद्यकीय  अधिकारी आणि कर्मचारी नोटांचे बंडल  घेऊन तयार आहेत. 

गेल्या महिनाभर ज्यांच्या प्रतिनियुक्ती झाल्या त्याची सखोल चौकशी करून, बेकायदेशीर प्रतिनियुक्ती देणाऱ्या जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ,. राजाभाऊ गलांडे यांची तात्काळ उचलबांगडी  करावी आणि सखोल चौकशी करून, कडक कारवाई करावी, अशी मागणी होत  आहे.  डॉ,. राजाभाऊ गलांडे यांनी कोरोना काळात गैरप्रकार केला म्हणून त्यांना काही काळ पदमुक्त करण्यात आले होते, पण पुन्हा सेटिंग लावून त्यांनी पुन्हा जिल्हा शल्य चिकित्सकांची  खुर्ची मिळवली आहे. 

राज्याचे आरोग्यमंत्री प्रा.  तानाजी सावंत हे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आरोग्य विभागाच्या योजना धाराशिव जिल्ह्यात आणण्यासाठी ते प्रयत्नशील असताना, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे हे आरोग्यमंत्री प्रा.  तानाजी सावंत यांचे नाव खराब करत आहेत. 


 
 

From around the web